32.7 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » प्रि. महाडिक उद्यानाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन
महाराष्ट्र

प्रि. महाडिक उद्यानाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिनदर्शिका म्हणजे वर्षातील तारखांबरोबरच आठवड्याचे वार, महिने, सुट्ट्या इत्यादी माहिती दर्शवण्यासाठी वापरलं जाणारं कोष्टक. मराठी दिनदर्शिकेत अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी यांच्यासोबत मराठी सणांचीही माहिती असते. तर बँकेच्या दिनदर्शिकेत बँकेच्या सुट्ट्यांची महिती असते. सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेत अशाच प्रकारे माहिती दाखवली जाते।

पण प्रि. वामनराव महाडिक उद्यानात रोज सकाळी व्यायामाला, चालायला किंवा योगासनं करायला येणाऱ्या मित्रमंडळींनी वर सांगीतलेल्या माहितीसह अजून वेगळी माहिती ह्या दिनदर्शिकेत देण्याचं ठरवलं. दिनदर्शिका २०२२ चं नियोजन करण्याच्या कामात छायाचित्रकार, गायक अशोक पवार यांनी पुढाकार घेतला. अशोक पवार म्हणाले,”मी ठरवलं होतं की, प्रि. वामनराव महाडिक उद्यान मित्रमंडळाच्या नावाची १२ महिन्यांची मराठी दिनदर्शिका असावी. आपल्या उद्यानात येणाऱ्या छोट्यामोठ्या व्यावसायिकांची त्यात जाहिरात असावी. ती जाहिरात भिंतीवर वर्षभर दिसावी आणि त्यातूनच प्रत्येकाचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा.”।

प्रि. वामनराव महाडिक उद्यानात २८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठिक ८:१५ वा. गुरुजींच्या हस्ते दिनदर्शिका २०२२ चं विधीवत पूजन झालं आणि उद्यानाचे अध्यक्ष सुरेश बावकर यांच्या हस्ते ते प्रकाशित आणि वितरित करण्यात आलं. त्याप्रसंगी मंडळाचे आनंद कोंडकर, रमेश लांबे, शाम बेन्सेकर, श्री. जगताप, श्री. भालेकर, श्री. शेंडकर, बाळकृष्ण नानेकर, योगगुरू सुनिल शिरसाट, दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितिन कोलगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आपल्या मनोगतातून ह्या अप्रतिम कल्पनेसाठी अशोक पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. उद्यानात येणाऱ्या सर्वांना सदर दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले।

दिनदर्शिकेसाठी आणि प्रकाशन सोहळ्यासाठी युवा उद्योजक उदय अशोक पवार, जितेंद्र सावंत, राजन कोळी, सुशिल मोहिते, राजू बोडके, आशिष दिघे, सत्यप्रकाश भालेकर, शेखर बांदल यांनी सर्वतोपरी सहकार्य केले।

Related posts

कल्याण के प्लेटफार्म नम्बर 4 पर आरपीएफ थाने में झंडा वंदन कर तिरंगे को दी सलामी

Bundeli Khabar

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे और सलमान खान की उपस्थिति में ‘धर्मवीर’ का ट्रेलर लॉन्च

Bundeli Khabar

“Gansaraswati” Award Announced to Anuradha Kuber

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!