37.1 C
Madhya Pradesh
May 16, 2024
Bundeli Khabar
Home » केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मॅसिमो पिझेरिया आउटलेटचे उद्घघाटन
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मॅसिमो पिझेरिया आउटलेटचे उद्घघाटन

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुंबई : फास्ट लाईफ आणि फास्ट फूडसाठी मुंबई जगभर ओळखली जाते. आता मुंबईच्या खाद्यपदार्थांमध्ये आणखी भर घालण्यासाठी मॅसिमोज पिझेरिया हे नवीन फास्ट फूड आउटलेट सर्वांसाठी खुले झाले आहे. खरं तर पिझ्झा हा एक पाश्चात्य खाद्यपदार्थ होता जो आता जागतिक स्तरावर लोकप्रिय आहे. येथील लोकप्रिय खाद्य कंपनी केटर्स ब्लूचे मेहबूब खान यांनी मुंबईतील मॅसिमो पिझेरिया ब्रँड लाँच केला आहे. वांद्रे कार्टर रोडवरील मासिमो पिझ्झेरिया आउटलेटचे उद्घाटन रामदास आठवले (सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मेहबूब खान, कार्टर ब्लू आणि मॅसिमो पिझेरियाचे प्रवर्तक म्हणाले, “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत फाइन डाईनचा व्यवसाय करत आहोत. आमचे आत्तापर्यंतचे खास वैशिष्ट्य म्हणजे लेबनीज फूड पण माझ्या लक्षात आले आहे की मुंबईतील फास्ट फूड म्हणजे पिझ्झा आणि येथूनच मॅसिमो पिझ्झेरियाची कल्पना सुचली. त्याची खास गोष्ट म्हणजे हा पिझ्झा जळाऊ लाकडाचा वापर करुन पारंपारिक पध्दतीने तयार केला जातो. आम्ही मॅसिमो पिझ्झेरियाची चव आणि प्रकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठेवले असुन भारतीय स्वादांचे मिश्रण देखील याठिकाणी पहायला मिळणार आहे. आमच्या आउटलेटवर खवय्ये थेट चुलीवरच्या पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकतात.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, मुंबईत जगभरातील लोकप्रिय पाककृती उपलब्ध आहेत. मॅसिमो पिझेरियाच्या नवीन आउटलेटसाठी मी प्रवर्तकांना शुभेच्छा देतो. तरुणांसाठी आणि कौटुंबिक सहलीसाठी वांद्र्याच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेले हे एक आदर्श ठिकाण आहे. मला खात्री आहे की लोकांना याठिकाणी उपलब्ध असलेले नवीन फ्लेवर्स आणि मॅसिमो पिझ्झेरियाची विविधता नक्कीच आवडेल.

मॅसिमो पिझ्झेरियाच्या वांद्रे आउटलेटनंतर लवकरच दादरमध्येही फूड जॉइंट सुरू होणार आहे. प्रवर्तक भविष्यात खाद्य मेनूमध्ये फास्ट फूड तसेच उत्तम जेवण एकत्रित जोडण्याची योजना आखत आहेत. मॅसिमो पिझेरियाची मुंबई उपनगरात अनेक आउटलेट सुरु करण्याची योजना आहे.

Related posts

एफडब्लू्आईसीई ने जताया डॉक्यूमेंट्री काली के पोस्टर का विरोध

Bundeli Khabar

एकल श्रीहरि का स्नेह सम्मेलन 13 नवंबर को, मुख्य अतिथि के रूप में राज्यपाल आमंत्रित

Bundeli Khabar

पुरग्रस्तांना एक हात मदतीचा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!