21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » सावळाराम क्रीडा संकुल समोर वृक्ष वाटिकांचा बस्तान , प्रभाग क्षेत्र अधिकारांचा आर्थिक आशीर्वाद
महाराष्ट्र

सावळाराम क्रीडा संकुल समोर वृक्ष वाटिकांचा बस्तान , प्रभाग क्षेत्र अधिकारांचा आर्थिक आशीर्वाद

सावळाराम क्रीडा संकुल समोर वृक्ष वाटिकांचा बस्तान , प्रभाग क्षेत्र अधिकारांचा आर्थिक आशीर्वाद
वाहतूक कोंडी होऊन अपघातांचे प्रमाण वाढ ।

प्रमोद कुमार/महाराष्ट्र

डोम्बिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱयांना पंथ रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहे काही अपघात झाल्यास त्याबाबत संबंधित प्रमुखावर गुन्हा नोंद करण्याचे शासनाने ही नियम केले आहेत मात्र चिरीमिरी घेऊन फ” प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी सावळाराम क्रीडा संकुल समोर घरडा सर्कल बाजूला वृक्ष वाटिका बेकायदेशीर बस्तान बसवले आहेत त्यामुळे याना पालिका आयुक्त यांचे आदेशांचे विसर पडला आहे का असा वाटसरू आणि वाहनधारक बोलत आहेत १० दुकान धारकांनी पूर्ण डीपी रस्ताच व्यापला आहे त्यामुळे वाहतुक कोंडी होऊन किरकोळ अपघात होऊन भांडणे होत आहेत त्यामुळे फ प्रभाग क्षेत्र अधिकारी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का आणि डीपी रस्त्यावर आणि पंथ रस्त्यावर बस्तान मांडण्याचा अधिकार कोणी दिला असा पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे कोणता मोठा अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर ही गुन्हा दाखल करावा म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव होऊन अतिक्रमणे हटवतील.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या फ” प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत डीपी रस्ता आणि पंथ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी होऊन अपघात घडण्याचे प्रमाण ही वाढले आहेत काही महिन्यांपूर्वी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी डीपी रस्ते आणि पंथ रस्ते यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत मात्र काही अधिकारी आदेश, नियम धाब्यावर बसवितांना दिसत आहे . डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल जवळील सावळाराम क्रीडा संकुल समोर बेकायदेशीर अतिक्रमण करून १० वृक्ष वाटिका दुकाने थाटली आहेत त्यांनी आपले बस्तान अर्धा रस्ताच व्यापून टाकला आहे त्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की चक्का डीपी रस्त्यावर तात्पुरती शेड उभारली आहेत प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांना बिदागी मिळत असल्याने कदाचित कुठलेही कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात घडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे प्रभाग कार्यालयाचे अधिकारी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न वाहनधारक आणि परिसरातील रहिवाशी विचारात आहेत .आणि भविष्यात काही या भागात अपघात झाल्यास या घटनेत कारणीभूत म्हणूं न प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर ही गुन्हा दाखल व्हावा म्हणजे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे गांभीर्य निर्माण होऊन पंथ रस्ते आणि डीपी रस्ता मोकळे होतील
दरम्यान फ ” प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांना पंथ रस्ता आणि डीपी रस्त्या वरील अतिक्रमणे विषयी विचारले असता कामाचे बोला, म्हणत त्याभागात नागरिक कचरा आणि संडास करीत असल्याने त्यांना वृक्ष वाटिकाचे बस्ताना मांडण्याचे कार्यालया व्दारे मज्जाव केला जात नाही . पण दोन दिवसात त्यांना जेसीबी व्दारे हटवणार असल्याचे सूतोवाच प्रतिक्रिया देता वेळी केला आहे .

Related posts

बसपा का महापौर बनाएंगे संदीप ताजने, उत्तरभारतीयों को पूरा सहयोग करेगी बसपा

Bundeli Khabar

ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदी श्रीमती.छायादेवी शिसोदे यांची नियुक्ती

Bundeli Khabar

धोबीघाट की जनता खुशी के बीच श्रीकांत मिश्र का धूमधाम से मनाया गया जन्मदिन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!