28.7 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20211025 WA0000
खेल

राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप सांगलीत रंगणार

Bundelikhabar

राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र ज्युडो संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धा ३० व ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत सांगली येथील शांतीनिकेतन लोक विद्यापीठात होत आहे. यावेळी विजेत्या खेळाडूंना लुधियाना (पंजाब) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. एमआयएएस, भारत सरकार आणि जेएफआय यांच्या वतीने या राष्ट्रीय स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होणार आहेत.

राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धेचे यजमानपद यंदा सांगली जिल्ह्याला मिळाले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र ज्यूडो संघटनेचे अध्यक्ष अॅड. धनंजय भोसले, महासचिव शैलेश टिळक, दत्ता आफळे, रवी पाटील, कावस बिलिमोरिया, यतीश बंगेरा (मुंबई), गौतम पाटील, डॉ. अशोक पाटील, चंद्रशेखर साखरे, राहुल सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही निमंत्रित करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरदेखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.


Bundelikhabar

Related posts

टाटा आयपीएल – गुजरात टायटन्सचा रोमहर्षक विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – अटीतटीच्या लढतीत लखनौची सरशी

Bundeli Khabar

टीसीएल क्रिकेट फेस्टिवल 2021 का आयोजन

Bundeli Khabar
error: Content is protected !!