39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » जाणून घ्या अंडाशयाच्या कर्करोगाबद्दल – डॉ सुहास आग्रे
महाराष्ट्र

जाणून घ्या अंडाशयाच्या कर्करोगाबद्दल – डॉ सुहास आग्रे

जाणून घ्या अंडाशयाच्या कर्करोगाबद्दल – डॉ सुहास आग्रे (कर्करोग तज्ञ, एसीआय कम्बाला हिल हॉस्पिटल)

संतोष साहू/महाराष्ट्र

मुम्बई :अंडाशयाच्या कर्करोगाबद्दल  जाणून घेऊ इच्छिता मग, हा लेख वाचा कारण तुम्ही तुमच्या सर्व शंका याठिकाणी दूर करू शकाल. तसेच, जर तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला त्रास होत असेल तर उपचारांना विलंब करू नका. वेळेवर उपचार करणे हीच या आजारावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. अंडाशयाचा कर्करोग हा एक घातक ट्यूमर आहे जो स्त्रीच्या अंडाशयात किंवा अंडाशयावर आढळून येतो. काही वेळेस ही गाठ सौम्य असते तर काही वेळी ती घातकही ठरु शकते. या प्रकारच्या कर्करोगाची सुरुवात अंडाशयात होते, स्त्रीचे प्रजनन अवयव जसे जे अंडाशय किंवा अंडी तयार करतात आणि जे ओटीपोटाच्या अवयवांमध्ये तसेच फुफ्फुसांसारख्या इतर अवयवांमध्ये देखील पसरतात. बर्‍याच स्त्रियांना या कर्करोगाविषयी माहिती नसते आणि बरीच प्रकरणे नोंदवली जात नाहीत. याविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे तसेच याविषयीचे सर्व गैरसमज दूर करणे ही काळाची गरज आहे.
 जर तुम्हाला अंडाशयाचा कर्करोग असेल तर विशेष म्हणजे यात सुरुवातीच्या टप्प्यात, पांढरे जाणे, योनीमार्गातील द्रावाला दुर्गंधी येणे किंवा समागमानंतर रक्तस्राव होणे यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. त्यामुळे अंडाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.परंतु, नंतरच्या टप्प्यात, ओटीपोटात अस्वस्थता जाणवणे, सूज आणि इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे, भूक न लागणे अशी विविध चिन्हे असू शकतात. एकदा तुम्हाला ही लक्षणे दिसल्यावर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे लागतील.वयाच्या पस्तीशीनंतर होणारी गर्भधारणा, काही औषधे किंवा एन्ड्रोजनचा वापर आणि अंडाशय कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असणे हे या कर्करोगाला आमंत्रित करू शकतात. जर तुम्हाला याबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा. अंडाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीची निवड करा जेणेकरून त्याविषयी खात्री करून घेता येईल.
आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की फायब्रॉईड्सचा अंडाशयाच्या कर्करोगाशी कोणताही संबंध नाही आणि बहुतेक गर्भाशयाचा अल्सर कर्करोगग्रस्त नसतात आणि घातक ठरत नाहीत. परंतु, काही ओव्हेरियन अल्सर असतील जे कर्करोगाचे असू शकतात आणि देखरेखीची आवश्यकता असते. जर तुम्हाला अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले असेल तर तुम्हाला अंडाशयांसारख्या कर्करोगाच्या पेशींमुळे प्रभावित झालेल्या अवयवांसह लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले जाईल. शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी, हार्मोन थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी ज्यात औषधे कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी आणि सामान्य पेशींचे नुकसान कमी करण्यासाठी वापरली जातात. जेव्हा अंडाशय काढून टाकले जातात तेव्हा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीची निवड एस्ट्रोजेनची पातळी पुनर्संचयित करण्यात मदत करू शकते.

Related posts

हृदयाच्या रुग्णांनी प्रवास करताना अशी घ्या काळजी

Bundeli Khabar

१५० लसीकरण करण्यात आले

Bundeli Khabar

बापगांव देवरुंग येथील १४ जर्षि गायींचा मृत्यू

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!