34.2 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » बातमी लिहिताना माहिती हे तुमचं अन्न आहे व अन्न मिळाले तरच आपलं पोट भरू शकतो – कैलास म्हापदी
महाराष्ट्र

बातमी लिहिताना माहिती हे तुमचं अन्न आहे व अन्न मिळाले तरच आपलं पोट भरू शकतो – कैलास म्हापदी

पूर्वी आम्ही गरीब होतो पण चलवळ श्रीमंत होती मात्र आता आम्ही श्रीमंत झालो व चलवळ गरीब झाली- सुनील खांबे।

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक मा.श्री श्री संजय जी भोकरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे, वृत्तवाहीनी प्रमुख श्री रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.राकेश टोळे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने आणि कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष श्री. नितीन शिंदे व वेदांत हाँस्पीटलचे संचालक डाँ.अब्रार खान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहर व पत्रकार संघाच्या सभासदांना मोफत हेल्थ कार्डचे वितरण,पत्रकारिता मार्गदर्शन तसेच इको फ्रेंडली गणपती सजावट व सेल्फी विथ गणपती बाप्पा च्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण संमारंभ या कार्यक्रमाचे आयोजन गार्डन लाँन गडकरी रंगायतन ठाणे येथे करण्यात आले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक पहिले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांना मार्गदर्शन कार्यक्रमात
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा माझा कुटुबं आहे. आज आपला बैल सोहळा आहे. त्यानिमित्ताने आपण आज सगळे जमले आहोत, आपण पत्रकार नसून बातमीदार आहोत पत्रकार हा भुलभुलैया आहे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार सुभाष जैन यांना मानाव लागेल कारण ते सेवाभाव म्हणून पत्रकारिता करत आहेत, पत्रकाराने माहिती मिळवणे हे त्याचं अन्न आहे जर ते मिळालं नाही तर त्याचं पोट भरणार नाही.
समाजाला ३६५दिवस राबणारा पत्रकार बैल हवा आहे असे वक्तव्य उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना दै जनादेश चे संपादक कैलास म्हापदी यांनी केले. ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला कुठे भेटावं याचे उत्तर आहे शेताच्या बांधावर तसेच वारकर्‍यांनी वारकर्‍यांना कुठे भेटाव एकतर पंढरीच्या वारीमध्ये अथवा एखाद्या हरिनाम सप्ताहामध्ये भेटावे , तसेच पत्रकारांनी पत्रकारांना कुठे भेटावे ते म्हणजे पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला येऊन भेटावे असं कुठे भेटणे म्हणजे भेट नसते खरी भेट सर्वांच्या सोबत राहून होते कारण त्या ठिकाणी विचारांची देवाण-घेवाण होते म्हणून असे उपक्रम राबवले पाहिजेत , आता मात्र पत्रकारांमध्ये एकजूट दिसत नाही हातात हात धरून चालताना दिसत नाही आता मात्र हातातला हात सूटताना जास्त प्रमाणात दिसून येतो म्हणून आपण संघटित होणे गरजेच आहे, असं असताना देखील सच्चा पत्रकारांनी अजूनही आपल्या जनसेवेचे कार्य अविरतपणे चालू ठेवलेले आहे, असेही शेवटी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले ,तसेच कर्मवीर सुनिल ख‍ांबे यांनी सामाजिकतेवर भर देत पत्रकार‍ विषयाची गांभीर्यता ओळखुन योग्य पत्रकारीता करण्याचे मार्गदर्शन करत खास आपल्या शैलीत राजकीय चिमटे घेत कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्याने सांगितले की आम्ही गरीब होतो पण चलवळ आमची श्रीमंत होती मात्र आज आमची चलवळ गरीब झाली आणि आपण मात्र श्रीमंत झालो. आपल्याला दृष्टी बदलता येते परंतु दृष्टीकोन बदलता येत नाही पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे व त्या स्तंभा प्रमाणे आपण काम केले पाहिजे, सध्या राज्यकर्त्यांकडून पत्रकारांनी काय आदर्श घ्यावा कवी ,साहित्यिक ,लेखक ,संत, महापुरुष यांनी दिलेल्या विचारांचे काय करावे असाही प्रश्न निर्माण होतो पत्रकारांनी पत्रकारितेतील प्रामाणिकपणा जपा त्यामध्ये राजकारण करू नका असे ज्येष्ठ पत्रकार सुनील खांबे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच ठाण्यातील जेष्ठ माजी नगरसेवक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव मनोज शिंदे य‍ांनी कार्यक्रामास उपस्थित राहुन सदर उपक्रमाचे कौतुक केले,
सजावट स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच वेदांत हाँस्पीटलचे संचालक डाँ. अब्रार खान यांच्या तर्फे संघातील पदाधिकारी व सदस्य यांना मोफत हेल्थ कार्ड देण्यात आले ज्यामध्ये अनेक सुविधा आहेत ज्यामुळे पत्रकार यांना आरोग्यविषयाची सवलत ही वेदांत हाँस्पीटल यांच्याकडून देण्यात आली सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांचन सोनावणे यांनी केले


यावेळी ज्येष्ठ पत्रकार दै. जनादेश संपादक कैलाश म्हापदी, कर्मवीर सुनिल खांबे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मनोज शिंदे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुखदेव घोलप,
स्थायी समिती सभापती संजय भोईर, जिल्हा माहिती जनसंपर्क अधिकारी नंदकुमार वाघमारे, वेदांत हाँस्पीटलचे संचालक अब्रार खान आदी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते त्यांचबरोबर पत्रकार संघाचे पदाधिकारी कोकण विभागीय सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री. किशोर बळीराम पाटील, पालघर अध्यक्ष श्री.विकास पाटील,ठाणे शहर सचिव श्री.मिलिंद दाभोळकर, सल्लागार श्री. प्रमोद घोलप, उपाध्यक्ष श्री. संजय भोईर, कार्याध्यक्ष श्री.अतुल तिवारी, संघटक श्री.मनोज कदम, संपर्क प्रमुख श्री. सतीश कुमार भावे,सहसचिव श्री.अमित जाधव, कल्याण संपर्क प्रमुख मिनल पवार, सहसंपर्क प्रमुख – प्रशांत मोटे, कार्यकारणी सदस्य श्री.अश्विन कांबळे,कार्यालयीन व्यवस्थापक श्री.अभिषेक चव्हाण, सह वुत्तवाहीनी प्रमुख संतोष पडवळ, प्रसिध्दी प्रमुख – देवेंद्र शिंदे, सुबोध कांबळे, अमित गुजर व इतर सदस्य – संजय ताबंडे, प्रसाद जावडे, राहूल लाड, राजेंद्र गोसावी, ख्वाजा शेख, सुभाष जैन,देवेंद्र वाईरकर,राहुल अहिरे, विशाल शिपाई,सतीश कुदंळे, गफूर धारवार,बिरबल बंडगर, भरत सांवत व आदी सदस्य उपस्थित होते .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम व्य़वस्थापक व न्यूज मराठी व तरूण आव्हान प्रतिनिधी पत्रकार मनस्वी चौधरी,पत्रकार मनीष तळदेवकर, हर्षदा जाधव, निखिल पंडम मनाली मोरे, समाधान अवताडे, अश्विनी भालेराव सायली घोलप यांनी कोकण विभाग अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत घेतली.

Related posts

अपराध मुक्त समाज के लिए नैतिक शिक्षा आवश्यक : भगवान भाई

Bundeli Khabar

तीन तलाक के खिलाफ कानून बनाने की खुशी मे मुस्लिम महिलाओं ने भाजपा मे किया प्रवेश

Bundeli Khabar

कार्यभार दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्वीकारला

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!