प्रमोद कुमार/महाराष्ट्र
पुणे : विश्रामबाग मित्र मंडळ ट्रस्ट , स्व रूपवर्धिनी ,बाळासाहेब देवरस संस्था, निरामय संस्था व सिरम इन्स्टिट्युट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोना बरोबर लढा देण्याकरिता मोफत लसीकरण आयोजित केले होते. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे ह्या साठी फोम पासून बनविण्यात आलेल्या मोठ्या लसी मार्फत जनजागृती मंडळा मार्फत करण्यात आली .कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शरद चंद्रचूड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नगर संघ चालक मोती बाग व प्रसिद्ध सिने अभिनेते माधव अभ्यंकर (रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक) ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांनी ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. एकूण १५० लसीकरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष नितीन कोतवाल, उपाध्यक्ष संतोष जगताप, कार्याध्यक्ष रविंद्र जाधव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंडळाचे कार्यकर्ते योगेश हेंद्रे, राजेश मांढरे, संजय जगताप, राहुल जाधव यांनी केले ।
Home » १५० लसीकरण करण्यात आले

