33 C
Madhya Pradesh
April 24, 2024
Bundeli Khabar
Home » हृदयाच्या रुग्णांनी प्रवास करताना अशी घ्या काळजी
महाराष्ट्र

हृदयाच्या रुग्णांनी प्रवास करताना अशी घ्या काळजी

संतोष साहू,

डॉ बिपीनचंद्र भामरे, सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन, मुंबई

मुम्बई। आता, कोविड-19 संबंधीत निर्बंध हटवणयात आले आहेत त्यामुळे लोकांनी उन्हाळी सुट्टीचे नियोजनही सुरु केले आहे. मात्र जर तुम्हालाहृदयाची समस्या आहे तर मात्र विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुम्ही सुट्टीवर जाण्याचा विचार करत आहात? किंवा अगदीकामाशी संबंधित कारणांसाठी प्रवास करताय मग तुम्ही काय कराल, सुरक्षितपणे प्रवास कसा कराल याबद्दल अधिक माहिती देणाराहा लेख.
हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD), ह्रदयाचे अनियमित ठोके, अलीकडील हृदय शस्त्रक्रिया, प्रत्यारोपित हृदय उपकरण, हृदय अपयश आणि फुफ्फुसीय धमनी रोग यासारख्या हृदयविकाराच्या समस्यांनी ग्रासलेले आहात का? तुम्हाला लांबचा प्रवास करण्याची काळजी वाटते का? पण घाबरून जाऊ नका कारण आम्ही तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय प्रवासकसा करायचा हे सांगतो.
प्रवास करण्यापूर्वी लेखात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा
· स्वतःचे मूल्यमापन करा: तुमच्या डॉक्टरांना भेटा, तुमच्या हृदयाच्या चाचण्या जसे ईसीजी, इकोकार्डियोग्राफी आणि तणावाच्याचाचण्या करा, तुमच्यासाठी प्रवास करणे सुरक्षित आहे का याची खात्री करा. छातीत दुखणे, दम लागणे किंवा थकवा यासारखी लक्षणेआढळल्यास डॉक्टरांना कळवा. प्रवासाच्या १-२ महिने आधी स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल तर प्रवास करू नका. कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी जाऊ नका. जेव्हा तुमचे तुम्हाला प्रवासासाठी अनुमती दिली जाईल तेव्हाच तुम्ही प्रवास करावा.
· लसीकरण करा: प्रवासापूर्वी कोविड-19 विरुद्ध लसीकरण करणे आवश्यक आहे. हृदयरोगी या आजाराला बळी पडतात आणिकोविडची लागण होण्याच्या ‘उच्च-जोखीम’ श्रेणीत येतात. तर, सावध रहा!
· तुमची औषधे घेऊन जाण्यास विसरू नका: तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला औषधांचा साठा करणे आवश्यक आहे. जर काहीकारणास्तव तुमचा मुक्काम वाढला तर काही जास्तीची औषधे जवळ असू द्या. प्रवास करत असताना औषधे वगळू नका. गोंधळटाळण्यासाठी औषधाला लेबल लावा.
· फ्लाइटमध्ये योग्य काळजी घ्या: केवळ बसुन न राहता थोड्याफार शारीरीक हलचाली करा.आरामदायी पादत्राणे निवडा, हायड्रेटेडराहण्यासाठी भरपुर पाणी प्या आणि आवश्यक असल्यास कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज घाला. जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तररक्ताच्या गुठळ्या होण्याचा (शिरासंबंधीचा थ्रोम्बोसिस) धोका जास्त असतो. तुम्ही बराच वेळ बसून राहिल्यास रक्ताभिसरण कमी होते. त्यामुळे पायांमध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून पाय हलवत रहा.
संतुलित आहाराचे पालन करा आणि हलका व्यायाम करा: तुम्ही सुट्टीवर असलात तरी, पौष्टिक अन्नाचे सेवन करुन तुमच्या हृदयाचीयोग्य काळजी घ्या. जंक फुड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा अतिरेक करू नका. खारट पदार्थ, अल्कोहोल आणि धूम्रपानाचे सेवनटाळण्याचा प्रयत्न करा. सुट्टीत चालणे, धावणे किंवा काही व्यायाम करणे सुनिश्चित करा.
· सावधगिरी बाळगा: छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अगदी थकवा यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नकाआणि वरील लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला संपूर्ण प्रवासात तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे लागेल. हृदयावर दबाव आणतील अशा कोणत्याही क्रियाकलापांची निवड करू नका. अतिश्रम करू नका.

Related posts

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य आणि बालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Bundeli Khabar

भिवंडीत शिवसेनेची घौडदौड सुरच

Bundeli Khabar

लघुवाद न्यायालयात ६६ खटले निकाली

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!