38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला मोठी आग
महाराष्ट्र

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला मोठी आग

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला मोठी आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची धडपड

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. भीषण आगीतून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. एका नागरिकाने जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याचीही माहिती मिळत आहे. इमारतीच्या १९व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग २५व्या मजल्यापर्यंत पसरली आहे.

वन अविघ्न मुंबईतील लालबाग परिसारातील गगनचुंबी इमारत. ही इमारत एकूण ६० मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. लेव्हल तीनचा कॉल आगीचं स्वरुप भीषण असताना दिला जातो. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

वन अविघ्न इमारतीच्या २१व्या मजल्यावरुन एका व्यक्तीने जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतून लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हात सुटल्यामुळे ती व्यक्ती इमारतीवरुन खाली पडली. या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

गोठेघर ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच, दोन ग्रामविकास अधिकारीसह इतर तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केल्यानंतर उपोषण मागे

Bundeli Khabar

जगण्याचे आर्त काव्यसंग्रहाचे रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रकाशन

Bundeli Khabar

गोदाम से चोरी किया 12 लाख का परफ्यूम व मेहदी सामग्री को किया बरामद ।

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!