22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » तारा आदिवासी सामाजिक संस्थे मार्फत गरीब व गरजू बांधवांना कपडे वाटप
महाराष्ट्र

तारा आदिवासी सामाजिक संस्थे मार्फत गरीब व गरजू बांधवांना कपडे वाटप

किशोर पाटील/महाराष्ट्र
जव्हार : आज युवा समाजसेवक प्रदीप कामडी तारा आदिवासी सामाजिक संस्थापक यांच्या नेतृत्वाखाली महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)अंतर्गत उड्डाणं लोकसंचालित साधन केंद्र मधील सर्व सहयोगिनी यांच्या सहकार्याने जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिपंळशेत खरोंडा मधील कोतीमाळ या पाडयात गरीब, गरजवंतांना आवश्यक असलेले हिवाळी आणि दररोजच्या वापरण्यायोग्य कपडे वाटप करण्यात आले..
आजच्या परिस्तितीत महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असताना गोर – गरीब जनतेचे (हातावर पोट असणाऱ्या) अन्न – वस्र या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जिकरीचे झाले आहे असातच गोरगरीब जनतेसाठी झगडणारे, झटणारे तळमळीने काम करणारे प्रदीप कामडी यांनी त्यांच्या सहकारी सामाजिक कार्यकर्त्यां सौ.नीता इंगळे, साक्षी राणे, छाया केसरकर, गीता शिंदे, ललिता मौळे, अमृता केसरकर, आकांक्षा उबाळे, मोहिनी गोटे, प्रिया शिंदे, जयश्री पोटघन, जानवी साठे, संगीता पाटील, प्रियांका रायबोले, मंगल पोटघन यांच्या मार्फत मदत म्हणून जमा केलेले कपडे स्वीकारून जव्हार तलुक्यातील ग्रामपंचायत पिपंळशेत खरोंडा मधील कोतीमाळ पाडा येथे या कपड्यांचे वाटप करण्यात आले याचा अनेक गरजू कुटुंबांना फायदा झाला.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे मार्गदर्क श्री.वसंत कामडी, जयवंत पोटींदा, गोविंद मोरे, गणेश हिरकुडा, परशुराम गवते व गावातील ग्रामस्थ, नागरिक, महिला, लहान मुले उपस्थित होते.

Related posts

गोरेगांव में महा मंगलकारी अनुष्ठान की भव्य तैयारियाँ

Bundeli Khabar

इंजिनीयर मनोज सखाराम माडगुळकर यांच्या विरोधात, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार

Bundeli Khabar

ज्येष्ठांच्या स्वप्नांचा चुराडा झाला

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!