38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » ज्येष्ठांच्या स्वप्नांचा चुराडा झाला
महाराष्ट्र

ज्येष्ठांच्या स्वप्नांचा चुराडा झाला

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : काही जेष्ठांना घराघरामध्ये धाकात आणि परकियांप्रमाणे रहावं लागतं. त्यांना मनमुराद जगू दिलं जात नाही. त्यांच्या अधिकारांच हनन होत आहे. समस्या गंभीर आहे आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या काही घरात हेच घडतं आहे. हि समस्या अशीच वाढत गेली तर ती आणखी गंभीर स्वरूप घेणार आहे. आपल्याकडे इतके पोथीपुराण, संस्कार कार्यक्रम धार्मिक स्थळात होतात. तसे प्रसार माध्यमातूनही प्रसारित होतात. पण या सगळ्याचा काही परिणाम होतो की नाही? असा प्रश्न पडतो. आपली मानसिकताच अगदी व्यवहार्य होऊ लागली आहे. ठराविक वयानंतर मुलाच आणि बापाचं पटत नाही. पराकोटीचे वैचारिक संघर्ष होतात. दोन पिढ्यातील अंतरामुळे तसेच सभोवताली अधुनिकता भौगोलिक प्रगती चौफेर होत आहे. याचाच दुष्परिणाम म्हणावा लागेल. सारा दोष सुनेवर देवूनही चालणार नाही. पण तिच्या वागण्याला माहेरकडचे लोक प्रोत्साहन देत असतील तर वाद होणारच. आणि मग असेच वाद त्यांच्या घरातही त्यांच्या सुनेकडून उदभऊ शकतात. आज चित्रवाहिन्यांवर ज्या अनेक मालिका दाखविल्या जातात त्यात प्रबोधन काहीच नाही. विनोद रसातळाला गेला. थोडफार चांगलं दाखवितात त्याच ग्रहण कोणीच करत नाही उलट त्यातील बिभत्सता, हिंसाचार, दंडेलशाही, हेकेखोरपणा, खोटी श्रीमंती, अहंपणा मात्र अनेकजण घेत आहेत. परदेशात ठराविक वयानंतर आई-वडिलांपासून मुलं जाणीवपूर्वक दुरावली जातात. आपल्याकडची संस्कृती या उलट आहे. वृद्धापकाळातील आधार म्हणून आपण मुलांकडे पाहतो पण ही मुलं डँबीस निघाली तर सार्‍या स्वप्नांचा चुराडा होतो. असाच चुराडा पंचवीस लाख ज्येष्ठांच्या स्वप्नांचा झाला आहे. ज्येष्ठांना हॉस्टेलवर ठेवणं हे फॅड वाढतय. हा एक समाजाला ढब्बा आहे त्यात ही नवीन आकडेवारी म्हणजे कहरच म्हणावा लागेल. न्यायालयात इतकी प्रकरणं का तुंबली आहेत? न्यायालयात न्याय मिळत नाही, कुटुंबात हेळसांड, ज्या हॉस्टेलवर वृध्दापकाळ घालवायचा तिथे आपला जोडीदार असेलच असं नाही. त्या जीवांची व्यथा अभ्यासली गेली पाहिजे. मागे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी जेष्ठांसाठीच्या एका वसतीगृहाचं उद्घाटन करण्यासाठी आले तेव्हा ते म्हणाले, हे शेवटचं हॉस्टेल असावं. आपल्या संस्कृतीला, विचारांना पटणारं हे धोरण सरकारलाही मान्य नाही. पण मनोहर जोशी यांच समाजानं मनावर घेतलं नाही. उलट वृध्दाश्रमांची संख्या आता प्रत्येक तालुक्यापर्यंत येवून पोहोचली आहे. शहरीकरणात आपण माणुसकी गमावली आणि ग्रामीण भागातील अशाश्वत आणि असुविधांमुळे माणसं गमावली अशी सारी स्थिती आपल्या सर्वांसमोर आहे. वृध्दाश्रमामध्ये जावू वेळ घालवू तेथील जेष्ठांशी 4 गोष्टी बोलू हा नवा पायंडा आपण पाडला पाहिजे. न्यायालयासमोर जेष्ठांच्या अडचणी येतात तेव्हा त्यांनी निकाल देताना केवळ शिक्षा म्हणून बघून चालणार नाही. जबाबदारीचं भान येईल अशा पध्दतीच्या सूचना केल्या पाहिजेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या कुटुंबाच्या नातेवाईक आणि शेजार्‍यांवर टाकली पाहिजे. यामुळे होईल काय? इतर कुटुंंबानाही अशा पध्दतीनं आपल्यावर कटूप्रसंगाला सामोरं जाण्याची आफत येवू शकते याची भिती बसेल. अनेक शिक्षा अनेक न्यायालय वेगवेगळ्या पध्दतीनं देत असतात. त्यांनी कुटुंब न्यायालयाच्या बाबतीत असा प्रयत्न जरूर करावा.जेष्ठांचे आशिर्वादच मिळतील.यात मुळीच शंका नाही.

Related posts

स्मरण शक्ति कैसे बढ़ाएं पर कार्यक्रम का आयोजन

Bundeli Khabar

नामदेव महाराजांच्या सामाधी स्थळाला पायदळी तुडवल्यामुळे शिंपी समाजाच्या वतीने जाहीर निषेध

Bundeli Khabar

कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत “स्वामी”ची दिवाळी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!