29.1 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » इंजिनीयर मनोज सखाराम माडगुळकर यांच्या विरोधात, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार
महाराष्ट्र

इंजिनीयर मनोज सखाराम माडगुळकर यांच्या विरोधात, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार

संभाजी मोरे/महाराष्ट्र
ठाणे : महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या नावाचा गैरवापर करत स्वयंम घोषित अध्यक्ष म्हणून वावरणाऱ्या ठाण्यातील इंजिनीअर मनोज सखाराम माडगुळकर यांच्या विरोधात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत माडगुळकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेने एका पत्रद्वारे दिली आहे।


महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन ही संघटना मागील २०-२५ वर्षापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हितासाठी कार्य करणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी संघटना आहे. या संघटनेने मागील कार्यकाळात आतापर्यंत ज्या अभियंत्यांना स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/पदवीका पास झाल्यानंतर शासकीय नोकरी लागली नाही अशांना कंत्राटदार नोंदणीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने विविध विभागात पाठपुरावा करून अनेक शासन निर्णय काढलेले आहेत. या संघटनेची २०-२५ जिल्ह्यात कार्यकारिणी असून जवळपास ७०,००० सभासद आहेत।


इंजि. मनोज सखाराम माडगुळकर हे संघटनेत दि. १३/७/२०१० पूर्वी महासचिव या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांनी दि. २९/७/२०११ रोजी आपल्या पदाचा कार्यभार सोडला होता. त्यानंतर ते संघटनेच्या कोणत्याही पदावर कार्यरत नव्हते. तरी सुध्दा ते या संघटनेचे राज्याध्यक्ष असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई / जिल्हा परिषद, ठाणे महानगरपालिका/हुडको/म्हाडा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक तसेच मंडळ व विभागीय कार्यालयात जावून संबंधीत अधिकारी / कर्मचाऱ्यावर दबाव टाकत असल्याचे मुंबई/ठाणे/रत्नागिरी/ पालघर या जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कळले. तसेच या संघटनेच्या रजि. नं. एनएसके / एन. ७८१ चा गैरवापर करत असल्याचे कळल्यामुळे त्यांना वैयक्तिकरित्या ताकीद दिली गेली. परंतु त्यानंतरही ते संघटनेच्या कार्यास काळीमा फासण्याचे कृत्य करण्याचे चालूच ठेवल्यामुळे संघटनेच्या दि. १५/९/२०१४ च्या सर्वसाधारण सभा ठराव क्र. ३ नुसार ६ वर्षाकरिता संघटनेतून निलंबीत करण्यात आले होते, अशी माहिती संघटनेने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
यानंतरही ते राजकीय लोकप्रतिनिधी / सु. बे. अभियंते / मंत्रालय स्तरावरील अधिकारी/कर्मचारी तसेच विभागीय स्तरावरील अधिकारी यांना या संघटनेचे राज्याध्यक्ष असल्याचे सांगून दिशाभूल करून या संघटनेच्या कार्याला काळीमा फासण्याचे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना दि. ७/८/२०१८ च्या सर्वसाधारण सभा ठराव क्र. ४ नुसार मनोज सखाराम माडगुळकर यास कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आता सुध्दा ते स्थानिक लोकप्रतिनिधी, सुशिक्षित बेरोजगार अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागातील मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी/क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, जिल्हा परिषद मधील अधिकारी, महानगरपालिका / हुडको/म्हाडातील अधिकारी / कर्मचारी यांना ते या संघटनेचा राज्याध्यक्ष असल्याचे सांगून या संघटनेचा गैरवापर करून या संघटनेच्या कार्यास काळीमा फासत असल्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी पायबंद घालण्यासाठी व पुन्हा भविष्यात या संघटनेचा गैरवापर करण्यापासून टाळण्यासाठी नाईलाजाने मनोज सखाराम माडगुळकर यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्याचे सर्व संमतीने ठरवण्यात आले।

Related posts

फॅमिली बॉईज ग्रुप ची पूरग्रस्तांना मदत.

Bundeli Khabar

गैस सिलेंडर से भरे ट्रकों की अवैध पार्किंग

Bundeli Khabar

एशिया टुडे रिसर्च और मीडिया एक्नॉलेज्ड द्वारा प्राईड आफ नेशन अवॉर्ड 2022 के विजेताओं का सम्मान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!