23.3 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » सुनील म्हसकर ठरले मानवसेवा विकास फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी
महाराष्ट्र

सुनील म्हसकर ठरले मानवसेवा विकास फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : मानवसेवा विकास फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारात वासिंद येथील सुनील म्हसकर हे मानकरी ठरले आहेत.
मानवसेवा विकास फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम व कार्यक्रम राबवत असते. नुकताच संस्थेच्या वतीने संस्थेचे प्रदेश संघटक व्ही. एस.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “जिल्हा व राज्यस्तरीय मानवसेवा पुरस्कार 2021” सन्मान सोहळा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे, शहापूर येथे 25 सप्टेंबर 2021 रोजी संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा व पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तिमत्वांना सन्मानित करण्यात आले.

यामध्ये ठाणे येथील श्रीरंग विद्यालयाचे सहशिक्षक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील “ग्लोबल टीचर” पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक सुनील म्हसकर सर यांस “राज्यस्तरीय मानवसेवा पुरस्कार 2021” ने गौरविण्यात आले.
सुनील म्हसकर सर हे राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांना यापूर्वी विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे प्रदेश संघटक व्ही.एस.पाटील, भाजप ओबीसी मोर्चा ठाणे ग्रा. जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेशकुमार धानके, ह.भ.प. कैलास महाराज निचिते, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी जनार्दन कोष्टी, पोलिस पाटील मनोज निचिते, विजयकुमार देसले आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Related posts

राकांपा के राष्ट्रीय महासचिव नरेन्द्र वर्मा का जन्मदिन सेवा सप्ताह के रूप में संपन्न

Bundeli Khabar

महापालिकेच्या फ प्रभागात अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

देवा गृप फाउंडेशनच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!