30.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220306 WA0017
महाराष्ट्र

देवा गृप फाउंडेशनच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न

Bundelikhabar

भिवंडी दि.४(प्रतीनीधी) अल्पावधीतच राज्यातील विवीध भागात सामाजीक कार्यातून आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या व तरुणांमध्ये प्रसिध्द असलेल्या देवा गृप फाउंडेशनच्या वतीने भिवंडी तालुक्यातील विविध मान्यवरांच्या शुभहस्ते पत्रकाराचां भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला

देवा गृप फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुजीत (पप्या) ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त व सचीव श्री.तानाजी मोरे यांच्या संकल्पनेनुसार तालुक्यातील पत्रकाराचां सन्मान सोहळा शुक्रवारी भिवंडी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री.बाळासाहेब वाकचौरे, भिवंडी तालुका पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रेय बोराडे देवा गृप फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री.संदीप ठाकरे, सहसचिव व भिंवडी महानगर पालिकेचे माजी नगरसेवक श्री.सुरेंद्र गुळवी युवा नेते श्री.जितेश पाटील, श्री.नितेश कासार, श्री.रवि पाटील, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. श्री.किशोर बळीराम पाटील भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख जेष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र काबाडी, श्री.संतोष चव्हाण, श्री.सूरजपाल यादव ,श्री.रवि वर्मा व मोठ्या संख्येने आदी पत्रकार उपस्थीत होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांना हेल्मेट व बॅगचे वाटप करून सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपस्थीत मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. संर्वानीच वाढदिवसा निमीत्त राबविलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमांबद्दल देवा गृप फाउंडेशनचे कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर तरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवा ग्रुप च्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली,


Bundelikhabar

Related posts

गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे

Bundeli Khabar

मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परभणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल ला दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले

Bundeli Khabar

गूडनाइट गोल्‍ड फ्लॅश व करीना कपूर खानचा डिजिटल जाहिरातीसाठी सहयोग, लोकांना मलेरिया व डेंग्‍यूपासून सुरक्षित राहण्‍याचे आवाहन

Bundeli Khabar
error: Content is protected !!