35.3 C
Madhya Pradesh
May 22, 2024
Bundeli Khabar
Home » आंबिवली ग्रामस्थांची श्रमदानातून ग्रामस्वच्छता    
महाराष्ट्र

आंबिवली ग्रामस्थांची श्रमदानातून ग्रामस्वच्छता    

किशोर पाटील/महाराष्ट्र        
वासिंद : गुंज सेवाभावी संस्था व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आंबिवली गावच्या ग्रामस्थांनी रविवार (ता. 26) श्रमदानातून ग्रामस्वच्छता उपक्रम राबविला।
यामध्ये गावकऱ्यांनी श्रमदानातून आंबिवली फाटा येथे विद्यार्थी व बस प्रवाशांचे ऊन पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी बांबूचे बस स्टॉप उभारले. तसेच आंबिवली फाटा ते आंबिवली गावा पर्यंतच्या एक किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढून रस्त्याची साफसफाई केली. तसेच शालेय परिसरातील वाढलेले गवत कापून शाळेची व परिसराची साफसफाई करण्यात आली. गुंज संस्थेच्या दिल्ली येथील टीमने शाळेला भेट दिली असता स्वच्छ, सुंदर व डिजिटल शाळा बघून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामस्थांनी केलेले श्रमदान व शाळेचे स्वरूप बघून लवकरच सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना व शाळेला भरीव स्वरूपात मदत करण्याचे आश्वासन गुंज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती शिक्षक सचिन ढमणे यांनी दिली.
यावेळी गुंज संस्थेचे जिल्हा प्रभारी राहुल ढमणे, शहापूर तालुका प्रभारी दत्ता पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले ।

Related posts

गोदरेज इंटरियो के अध्ययन में वर्क फ्रॉम होम के बाद ऑफिस जाकर काम करने से जीवन शैली होगी प्रभावित

Bundeli Khabar

हजारों बहनों की उपस्थिति में मनाया गया रक्षाबंधन

Bundeli Khabar

वर्षातील बहुप्रतीक्षित असलेला पुरस्कार सोहळा ह्या डिसेंबरमध्ये

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!