26.3 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210928 WA0014
महाराष्ट्र

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदला

Bundelikhabar

कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदला
ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष
दयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा

किशोर पाटील/महाराष्ट्र
शाहपुर : सोमवार दि‌नांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंद ला पाठिंबा देत ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हाभर आंदोलन केले.हे कायदे शेतकरी हिताचे नसून मूठभर धन दांडगे,उद्योगपती यांच्या फायद्याचे असुन यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे.त्यामुळे या कायद्या विरोधात शेतक-यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाले आहेत.शेतक-यांनी उभारलेल्या या आंदोलनाला काँग्रेसने जाहीर पाठिंबा देत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे शहापुर येथे आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा,शहापुर काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश धानके,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे, बहुजन विकास आघाडी योगेश हजारे तसेच प्रहार संघटना व सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

सनदी अधिकारी घडविण्यासाठी

Bundeli Khabar

कैलाश मासूम को म्यांमार एम्बेस्सी से मिला ‘बुद्धा पीस अवार्ड’

Bundeli Khabar

बसपा का महापौर बनाएंगे संदीप ताजने, उत्तरभारतीयों को पूरा सहयोग करेगी बसपा

Bundeli Khabar
error: Content is protected !!