21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » २३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व काव्यलेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

२३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व काव्यलेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे ३९ वतीने धोडींबा फुगे मैदान सभागृह, दिघी रोड, भोसरी येथे नुकताच २३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व २३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण आणि विविध पुरस्कार वितरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ समाजसेवक, अभियंता वसंत टाकळे (रत्नागिरी) यांच्या शुभहस्ते झाले. वृक्षपूजन करुन झाडाला पाणी घालुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने पर्यावरण संदेश देत उदघाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ उदय सर्पे (सिंधुदुर्ग), नक्षञाचं देणं काव्यमंच राष्टीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे (कवी वादळकार), सुप्रसिदध उद्योजक विजयशेठ फुगे, उद्योजक योगेश आमले, प्रा. शंकर घोरपडे, कविवर्या डॉ. अलका नाईक (मुंबई), युवा उद्योजक अमर फुगे, प्रा. दिलीप गोरे, गणेश डबडे, प्रा. डाॅ. राजेंद्र झुंजारराव, रामदास घुंगटकर, साईराजे सोनवणे, रामचंद्र पंडित इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी उदय सर्पे म्हणाले की,”कवींनी आपल्या कवितेची साधना करावी. शब्दांचा आविष्कार प्रभावी मांडून प्रतिभा फुलवंत ठेवावी. हक्काच्या व्यासपीठासाठी कवींनी नक्षञाचं देणं काव्यमंच परिवाराशी जोडावे. कवींनी सुंदर जग असल्याने सांगण्याचे काम केलेले आहे. आजच्या काळातील आधुनिक संत कवी आहेत.”
यावेळी समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार कवी रामचंद्र पंडित (सातारा) यांना प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी १६वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक – व्यासपीठ (नाशिक), द्वितीय क्रमांक – मोडीदर्पण (मुंबई), तृतीय क्रमांक – शब्दाई (पुणे) यांना यश संपादन केल्याबद्दल गौरविण्यात आले. नक्षञ गौरव पुरस्कार ही यावेळी पुढील मान्यवरांना देण्यात आला. त्यात वृषाली टाकळे (रत्नागिरी), यशवंत घोडे (जुन्नर), प्रा. शीतल कांडलकर (नागपूर), मोहन अप्पा घुले (भोसरी), यवनाश्व गेडकर (चंद्रपुर), पुष्पलता कोळी (जळगाव), प्रा. डाॅ. सत्येंद्र राऊत (उस्मानाबाद), डाॅ. लक्ष्मण हेंबाडे (सोलापुर), छाया ब्रम्हवंशी (गोंदिया), प्रा. अरुणा डांगोरे (नागपुर), ज्ञानेश्वर काजळे (जुन्नर), मंदार सांबारी (मालवण), भारती तितरे (गडचिरोली), प्रा.दिलीप गोरे (चाकण) इ. ना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपञ मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.
हा उपक्रम भारताच्या स्वातंञ्यांच्या अमृत महोत्सव वर्षांनिमित्त व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले. आभारप्रदर्शन रामदास हिंगे यांनी केले.
यावेळी २३ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेला यावर्षी ३७५ कवितांतून पुढील कवींनी यश संपादन केले.त्यात प्रथम क्रमांक संध्या ठाकूर (अलिबाग), द्रितीय क्रमांक डाॅ. राजेंद्र झुंजारराव (पुणे), तृतीय क्रमांक वृषाली टाकळे (रत्नागिरी), उत्तेजनार्थ क्रमांक-१ भाऊसाहेब आढाव (चिंचवड), उत्तेजनार्थ-२ निर्मला जीवने (नागपुर), उत्तेजनार्थ-३ रामदास अवचर (अहमदनगर) यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात मोहन कुदळे, पियुष काळे, प्रमोद डोंगरदिवे, गणेश डबडे, रामदास हिंगे, प्रीती सोनवणे, अप्पा घुले, यशवंत घोडे, डाॅ. अलका नाईक, दिव्या भोसले, यशवंत गायकवाड, अनिता बिराजदार इ. पुढाकार घेतला. राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफलमध्ये ७५ कवींनी कविता सादर करुन काव्यमैफल रंगविली. या मैफलीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, उस्मानाबाद, गडचिरोली, सोलापुर, जळगाव, नाशिक, मुंबई, ठाणे, मालवण, चाकण, जुन्नर,खेड, चिंचवड, काञज, कणकवली, चिखली, भोसरी, आळे, पिंपरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर इ. भागातील अनेक कवींनी सहभाग घेतला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Bundelikhabar

Related posts

अवैध इमारतों की शिकायतें अनदेखा करते है मनपा अधिकारी

Bundeli Khabar

नेहरू सेंटर में इंडियन आर्ट प्रमोटर द्वारा आयोजित हुआ ‘कलास्पंदन आर्ट फेअर – 2022’

Bundeli Khabar

शहर व सिडको परिसराला उद्या पाणीपुरवठा होणार नाही

Bundeli Khabar
error: Content is protected !!