22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » सफाळे- कल्याण बसमध्ये हरवलेले प्रवासाचे पर्स प्रामाणिकपणे केली परत
महाराष्ट्र

सफाळे- कल्याण बसमध्ये हरवलेले प्रवासाचे पर्स प्रामाणिकपणे केली परत

किशोर पाटील/महाराष्ट्र
पालघर : कल्याण बसमध्ये दि.१९ रोजी प्रवासाच्या वेळी पर्स बस मध्ये विसरले होते . सफाळे आगारातील वाहक- चालक यांनी बस मध्ये मिळालेले मौल्यवान वस्तूचे पाकिट पर्स आगारात जमा केले. सफाळे आगारातील बस कल्याण कडे जात असताना बस मध्ये मौल्यवान वस्तू असलेल्या पर्स पॅकेट सापडले होते. बस चालक दिपक पाटील व वाहक एन.जे.नरोटे यांनी बसमध्ये विसरले मौल्यवान वस्तू आगारात जमा करण्यात आले होते. त्यामध्ये तीन हजार रोख, मोबाईल, सोन्याची कानातील वाली असा अंदाजे ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता.

भिवंडी तालुक्यातील महापोली येथील महिला प्रवासी नुसरतजहाॅ अभी अन्सारी यांनी सर्वत्र शोधाशोध करूनही मिळाले नसल्याने चिंतेत असल्याने . त्यानंतर सबंधीत प्रवासी व्यक्ती यांना वाहक दीपक पाटील यांनी संपर्क करून विसरलेला प्रवासी व्यक्ती चा शोध घेण्यास सुरुवात केली. बस वाहक यांनी सदर महिलेला प्रवासीला फोनवर संपर्क साधून माहिती दिली होती.
सफाळे आगारात ओळख पटवून दिल्यानंतर सफाळे बस व्यवस्थापक हेमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानक प्रमुख सनी जोशी उपस्थितीत त्या प्रवाशाला मौल्यवान पर्स पॉकेट परत करण्यात आले. सफाळे बस आगारातील वाहक व चालक यांनी प्रामणिकपणा दाखवल्यामुळे कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Related posts

पांचवी और छठी रेलवे लाइन के निर्माण का कार्य रोक दिया जाएगा -आवास मंत्री जितेंद्र आव्हाड

Bundeli Khabar

सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना

Bundeli Khabar

मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!