30.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210922 WA0009
महाराष्ट्र

आगरी समाज व इतर समाज्याच्या आशीर्वादाने मराठी बिग बॉस सीजन – 3 मध्ये लोकप्रिय सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादूसची धमाल

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : महाराष्ट्रातील मराठी सिनेमाचे सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक,अभिनेते , महेश मांजरेकर यांचे दर्जेदार , सुत्रसंचालन लाभलेला आणि अत्यंत लोकप्रिय असलेल्या, चोखंदळ रसिक प्रेक्षकांच्या आवडीचा , मनोरंजक कार्यक्रम रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ पासुन सुरु झाला आहे. कलर्स मराठीवर बिग बॉस सीजन 3 ची दमदार सुरवात झालेल्या तसेच मनोरंजन विश्वात सर्वाधिक टिआरपी खेचणारा कार्यक्रम म्हणून मराठी बिग बॉस ओळखला जातो.” बिग बॉस च्या चावडीवर या ” अशा धमाकेदार शिर्षक गीताने कार्यक्रमाची सुरुवात होणाऱ्या मराठी बिग बॉसच्या या घरात जाण्याचं अनेक लेखक , दिग्दर्शक, कलाकार , गायक , संगीतकार अशा अनेक दिग्गजांचं स्वप्न असतं. यंदाच्या सीजन 3 मध्ये बिग बॉसच्या घरात असेच लोकप्रिय कलावंत दिसणार आहेत.संगीत क्षेत्रातील मराठी आणि आगरी-कोळ्यांचा व इतर समाज्याचा बप्पी लहरी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील लाडका लोकप्रिय गायक संगीताचा शानदार आवाज श्री.संतोष चौधरी उर्फ दादूस प्रेक्षकांना मराठी बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहे. तसेच भिवंडीतील कामतघर येथील दादूस म्हणजे संतोष चौधरी यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.सुप्रसिद्ध गायक संगीतकार दादूस यांना लहानपणा पासूनच संगीताची गाण्याची आवड, दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती. देवीच्या जागरणातून ते गाणी सादर करत. त्याला आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात.आगरी संस्कृती, संगीताचा वारसा गायक दादूस यांना बाबांकडूनच लाभला आहे. तसेच “आई तुझा लालुल्या” या लोकप्रिय गाण्याने दादूस यांना खरी ओळख मिळाली आहे. लहानपणी दोन्ही पायांमध्ये अपंगत्व होतं मात्र आईने दादूस यांची सेवा केली आणि दादूसला दोन्ही पायांवर उभं केलं आहे. अशी एक अविस्मरणीय आठवण दादूस यांनी मराठी बिग बाँस मध्ये सांगितली.तसेच बायांची गाणी, धौलगीते, कोळीगीते आदी लोकसंगीताचा बादशाह म्हणून गायक दादूस यांची एक स्वतंत्र ओळख आहे. त्याचप्रमाणे दादूस यांचा पेहराव, डोळ्यावर काळा गॉगल, गळ्यात जाड्या सोन्याच्या चैन, पाचही बोटात अंगठ्या हा सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्यासारखा सेम टू सेम असल्याने मराठी व आगरी-कोळ्यांचा बप्पी लहरी म्हणूनच दादूस यांना ओळखलं जात आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी उर्फ बप्पीदा हे गायक दादूस यांचे संगीतातील मोठे आदर्श आहेत.बप्पी लहरी यांच्या सुपर डुपर हिट, लोकप्रिय गाण्यांचे दादूस जबरदस्त चाहते आहेत. मराठी बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून दादूस निश्चितच प्रेक्षकांची मने जिंकतील व आगरी समाजाचे एकमेव गायक म्हणून त्यांनी कलर्स मराठी बिग बॉस सीजन 3 वर आपले नाव कोरले असे म्हणायला वावगे ठरू नये.त्यामुळे त्यांना त्यांचे संगीत क्षेत्रातील गुरुवर्य ,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री. किशोर बळीराम पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष भ्रमणध्वनीवरून बोलताना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


Bundelikhabar

Related posts

अलका पांडेय लिखित ‘गालियां’ लघुकथा संग्रह का ऑनलाइन लोकार्पण और परिचर्चा

Bundeli Khabar

ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ‘लस वाहिका’ मार्गस्थ

Bundeli Khabar

लेक लाडकी अभियानातर्फे भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२ साठी अावाहन

Bundeli Khabar
error: Content is protected !!