30.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन
महाराष्ट्र

मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथे “मराठा सामाजिक संस्थेच्या” वतीने मराठा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

‘विषय गंभीर तिथे मराठा खंबीर’ या उक्तीप्रमाणे मराठा समाजानेही जुन्या चालीरीती संस्कृती परंपरेत न अडकता गुजराती मारवाडी सिंधी लोकांप्रमाणे उद्योगात यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी “रिस्क” ही घेतलीच पाहिजे. शिवरायांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले होते तसेच आता त्यांचीच विचारधारा पुढे चालवत उद्योगक्षेत्रात जिद्दीनं उभे राहणे गरजेचे आहे.

मराठा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव सुर्वे, उपाध्यक्ष सुहास तावडे, कार्यवाहक संदीप भोसले, अश्विनीताई भोसले, कैलास येरुणकर, साक्षीताई घोसाळकर, उद्योग आणि सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल कदम यांनी नवउद्योग करणाऱ्यांना वेगवेगळे “बिझनेस माॅडेल” चे सादरीकरण करून संस्थेच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच सचिव विनायक सुर्वे, पदाधिकारी संदीप कदम, विजय सावंत, विजय मोहिते, सतिश भोसले, हनमंत माने, रवि कदम, शंतनु पवार, सविता पाटील आणि दिव्या विचारे या सर्वांनी आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले.

सुहास तावडे, भास्करराव सुर्वे, संदीप भोसले, अनिल कदम, अश्विनीताई भोसले, साक्षीताई घोसाळकर यानी मोलाचं मार्गदर्शन करुन मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहनही केले.

Related posts

बाढ़ पीड़ितों को कडोंमनपा ने तत्परता से मदद किया.

Bundeli Khabar

नवी उम्मेद परिवार द्वारा मानव बाल गृह आश्रम के बच्चों को आवश्यक वस्तुओं का उपहार

Bundeli Khabar

शातिर आरोपी पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!