किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : आर एस पी अधिकारी युनिट कल्याण डोंबिवली यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत समाज सेवक सुनील जी वायले नगरसेविका सौ.शालिनी सुनिल वायले आणि शिक्षक सेना यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठ विभागीय कार्यालय येथे गेल्या 20 दिवसापासून कोविड(कोरोना ) लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे दररोज 2000 नागरिकांना लस देण्यात येत आहे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व टीम वर्क मोठे काम करीत आहे.अत्यंत शिस्तीत कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था न बिघडवता , आर एस पी अधिकारी कल्याण-डोंबिवली युनिट यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिक अपंग यांना विशेष मदत उपलब्ध करून सेवा देत आहेत. आर एस पी युनिटच्या सामाजिक बांधीलके मुळे कल्याण-डोंबिवली परिसरात अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
Home » मुंबई विद्यापीठ विभागीय कार्यालय येथे गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेल्या कोरोना, लसीकरण मोहीमेला मोठा प्रतिसाद!

