23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » कल्याण एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई द्या – डाॅ. वंडारशेठ पाटील
महाराष्ट्र

कल्याण एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई द्या – डाॅ. वंडारशेठ पाटील

Bundelikhabar

महाराष्ट्र / ब्यूरो

कल्याण मध्ये २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुल मार्केट हे सखोल भागात असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचले होते. त्यानंतर हाताश झालेल्या फुल व्यापाऱ्यांनी २७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर लगेचच २८ जुलै रोजी सकाळी वंडारशेठ पाटील कल्याण एपीएमसी मधील फुल मार्केट मध्ये जाऊन पाहणी केली. त्याप्रसंगी व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या व कचराही फार मोठ्या प्रमाणामध्ये साठला असल्यामुळे आधीच कोविड-१९ चे संक्रमण चालू असताना या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती व्यापाऱ्यांनी निर्माण केली.
त्यानंतर फूल व्यापाऱ्यांनी कल्याण एपीएमसीचे सचिव व सभापती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सूचना वंडारशेठ पाटील यांनी सभापती व सचिव यांना दिल्या।
पाहणी दौरा करून व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह तहसिलदार दीपक आकडे यांना निवेदन देऊन झालेल्या नुकसान भरपाई मध्ये व्यापाऱ्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे, गल्ले, बिल पुस्तके, टेबल-खुर्च्या वाहून गेल्यामुळे सर्व व्यापार यांचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे तातडीने पंचनामे करून व्यापाऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनातून वंडारशेठ पाटील यांनी केली. त्यावर तहसिलदार दीपक आकडे यांनी मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले।
याप्रसंगी व्यापारी मंडळाचे रामदास यादव, भाऊ नरवडे, बाळू कदम, भरत मेमाने, अतुल धुमाळ, सतीश फुलोरे, कैलास फापाळे, गुड्डू राजभर, राष्ट्रवादी युवकचे प्रकाश हरड आदी पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

रस्त्यांची होणारी बोगस कामे हा ठाणे जिल्ह्याला शाप आहे – कपिल पाटील

Bundeli Khabar

बातमी लिहिताना माहिती हे तुमचं अन्न आहे व अन्न मिळाले तरच आपलं पोट भरू शकतो – कैलास म्हापदी

Bundeli Khabar

कल्याण डोंबिवली महानगरपालिका ,आर एस पी अधिकारी युनिट आणि कल्याण शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद

Bundeli Khabar
error: Content is protected !!