21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी दयानंद चोरघे यांची नियुक्ती
महाराष्ट्र

काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी दयानंद चोरघे यांची नियुक्ती

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रदेश कार्यकारिणी व 14 नव्या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली असून ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी भिवंडी येथील डॅशिंग नेते दयानंद मोतीराम चोरघे यांची नियुक्ती करण्यात आल्याने ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे।


काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शिफारशीने काल राष्ट्रीय महासचिव वेणूगोपाल यांनी महाराष्ट्रातील 14 नवे जिल्हा अध्यक्ष जाहीर केले असून दयानंद चोरघे यांच्यावर ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.दयानंद चोरघे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव पदाचा त्याग करून काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती,तेव्हापासून तेच अध्यक्ष होतील अशी चर्चा होती,ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच नावाची शिफारस केली होती.दयानंद चोरघे हे ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील एक दमदार व आक्रमक नेतृत्व असून सामाजिक भान जपत त्यांनी डी वाय फाउंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत,कोरोना काळात तर अनेकांना आर्थिक मदत व अन्नधान्य पुरवून लोकांना आधार दिला,स्वतः कोरोना बाधित होऊनही त्यांनी लोकांना मदत करण्याचे कार्य सुरूच ठेवले होते।


आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक,सह लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असून मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे, दरम्यान दयानंद चोरघे जिल्हा अध्यक्ष झाल्याने ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला असून दयानंद चोरघे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।


यावर आपली प्रतिक्रिया देत दयानंद चोरघे(नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष) म्हणाले की कुणाला विरोध करण्यासाठी मला हे पद दिले नसून काँग्रेस संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे,एक बूथ दहा युथ ही संकल्पना घेऊन मी काम करणार असून प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष प्रमुख नेते यांना सोबत घेऊन मी पक्ष संघटन वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे।


Bundelikhabar

Related posts

भाजपा शिवडी विधानसभा ई-श्रम कार्ड शिबीर

Bundeli Khabar

महापालिकेच्या जे प्रभागातील अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची कारवाई

Bundeli Khabar

वरळी-शिवडी लिंक रोडचे कामकाज आणि बाधित रहिवाशांचे पुनर्वसन

Bundeli Khabar
error: Content is protected !!