23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » अंबरनाथच्या मलंगगडापर्यंतची वाट होणार सुकर
महाराष्ट्र

अंबरनाथच्या मलंगगडापर्यंतची वाट होणार सुकर

Bundelikhabar

• मलंगगडाच्या मुख्य दोन रस्त्यांचा कामाला लवकरच सुरूवात, तर दोन रस्ते निविदा स्तरावर
प्रमोद कुमार

ठाणेः कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या मलंगगडापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांचा रस्त्यांवरचा प्रवास आता सुखकर होणार आहे. कल्याण मलंगगड रस्त्याचे लवकरच कॉंक्रिटकरण केले जाणार आहे. या रस्त्यांसाठी सुमारे 12.5 कोटींच्या कामाचे नुकतेच कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या उभारणीला लवकरच सुरूवात होणार आहे. तर कल्याण ते मलंगगड या रस्त्याच्या कामांसाठी अनुक्रमे 2.5 कोटी आणि 4 कोटींच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. या कामांसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचा दर्जा सुधारून त्यांचे मजबुतीकरण करण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, दिवा, मुंब्रा, उल्हासनगर या शहरांतील रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांसाठीही भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांना यश आले आहे. याचाच भाग म्हणून अंबरनाथ तालुक्यात येणाऱ्या प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या मलंग गडाकडे जाणाऱ्या भक्तांसाठी आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अंबरनाथ तालुक्यातील या मलंग गडाकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कल्याण मलंगगड रस्ता ते हाजीमलंग वाडीच्या फनिक्युलर लोअर ट्रॉली स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाठी 9 कोटी आणि कल्याण मलंगगड रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी 3.5 कोटीच्या कामाचे कार्यादेश नुकतेच देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाला सुरूवात होणार आहे. तर कल्याण मलंग गड या मार्गातील दोन रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी अनुक्रमे 2.5 आणि 4 कोटींच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. लवकरच ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल, अशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

या कामाचे कार्यादेश जाहीर
कल्याण मलंगगड रस्ता – निधी ३ कोटी ५० लाख रूपये
मलंगगड ते मलंगवाडी फनिक्युलर लोअर ट्रॉली स्टेशनपर्यंत चारपदरी पोच रस्त्यासह भूसंपादन आणि बांधकाम – निधी ९.०० कोटी
या कामांच्या निविदा
कल्याण मलंगगड रस्ता ८५ कि.मी. १५/८०० ते १६/६०० या भागात कॉंक्रिटीकरण – निधी २.५० कोटी
कल्याण मलंगगड रस्ता ८५ कि.मी. ६/२०० ते ६/५०० या भागात कॉंक्रिटीकरण – निधी ४.०० कोटी


Bundelikhabar

Related posts

दिव्यंगासाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप

Bundeli Khabar

वडार समाज के अध्यक्ष पद पर बाबण्णा कुशाळकर

Bundeli Khabar

सम्राट शेयर एंड केयर असोसिएशन्स वीर नेताजी सेवा मंडल की तरफ से नेत्र और हेल्थ चेकअप का आयोजन

Bundeli Khabar
error: Content is protected !!