32.3 C
Madhya Pradesh
May 13, 2024
Bundeli Khabar
Home » फिनटेक स्टार्टअप ‘पेटेल’ची १.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
व्यापार

फिनटेक स्टार्टअप ‘पेटेल’ची १.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

संतोष साहू/महाराष्ट्र

मुंबई : भारतातील सर्वात वेगाने वाढणारी बीएनपीएल फिनटेक स्टार्टअप पेटेल (Paytail) ने आपल्या बीज भांडवलांचा एक भाग म्हणून चोलामंडलम आणि इतर मोठ्या दानशूर गुंतवणूकदारांकडून १.५ दशलक्ष डॉलर्स जमा केले. कॅप टेबलवर चोला च्या प्रवेशामुळे प्लॅटफॉर्मवरील भांडवली पुरवठा आणखी मजबूत होतो जो बीएनपीएल फिनटेक व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा घटक आहे. अखंड ग्राहक अनुभव प्रदान करण्यासाठी आणि व्यापारी बाजूने विक्री वाढविण्यासाठी कंपनी नाविन्यपूर्णतेवर मोठे आव्हान पेलत आहे.
चोलामंडलम बरोबरच पेटेल ग्राहकांसाठी पूर्व-मंजूर कर्ज प्रस्तावाची पूर्तता करण्यासाठी इतर मोठ्या वित्तीय संस्थांचे जाळे तयार करण्यास वचनबद्ध आहे. मेपल कॅपिटल या व्यवहारासाठी इन्व्हेस्टमेंट बँकर आहे आणि स्ट्रास्टेज लॉ हे कंपनीचे कायदेशीर सल्लागार आहे.
पेटेलने उत्पादन वाढविण्यासाठी नवीन निधीचा वापर करण्याची आणि ऑफलाइन खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या अनुभवात बदल करण्यासाठी एक मजबूत टीम तयार करण्याची योजना आखली आहे आणि पुढील १२ महिन्यांत मासिक व्यवहारांत १० पट -१५ पट विकास दर साध्य करणार आहे.
पेटेलचे सहसंस्थापक विकास गर्ग म्हणाले, “पेटेल सुरुवातीपासूनच ऑफलाइन खरेदीदार आणि विक्रेते या दोघांसाठी समान संधी तयार करण्यासाठी अग्रेसर आहे, कारण या क्षेत्रातील किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या ई-व्यवसायांकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. भारताच्या किरकोळ विक्रीत ९५% योगदान देणाऱ्या विभागातील वास्तविक समस्यांकडे लक्ष देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, की जे सध्याच्या बीएनपीएल खेळाडूंच्या फक्त इंटरनेट वापरण्याच्या स्पर्धेपासून कोसो दूर आहेत. या निधीमुळे आम्ही उत्पादन वाढवू शकू आणि एक मजबूत टीम तयार करू शकू. भारतात सर्वात मोठी रिटेल बीएनपीएल फिनटेक तयार करण्याची आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही त्यादिशेने कार्यक्षमतेने काम करीत आहोत.”

Related posts

मिलेनियल्स निवेशकों का टैक्स बचत और दीर्घकालिक निवेश पर जोर : पेटीएम मनी

Bundeli Khabar

स्वाल कॉर्पोरेशन का अभिनव उत्पाद त्रिशुक

Bundeli Khabar

रिटेल एशिया अवार्ड्स में ‘द बॉडी शॉप इंडिया’ सम्मानित

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!