21.7 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20210916 WA0033
महाराष्ट्र

भिवंडी महापालिकेला लाजवेल असा काल्हेर ग्रामपंचायतीचा थाट

Bundelikhabar

भिवंडी महापालिकेला लाजवेल असा काल्हेर ग्रामपंचायतीचा थाट,गणेश विसर्जन घाटावरील सोयी सुविधा मध्ये जिल्हाभर नाव लौकीक

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नाव लौकीक असलेल्या काल्हेर ग्रामपंचायतीने राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून माजी आमदार श्री योगेश पाटील,जिल्हा परिषद सदस्य श्री.जयवंत पाटील,ज्येष्ट नेते छत्रपती पाटील,श्री.हरिश्चंद्र पाटील,माजी सरपंच श्री.संजय पाटील,भाजपा ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री.श्रीधर जयवंत पाटील तसेच आजी माजी सरपंच ,उपसरपंच, सदस् यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ.योगिता अनिल म्हात्रे,उप सरपंच श्री. भरत जयवंत पाटील,ग्रामविकास अधिकारी श्री.रमेश राठोड,व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी गणेश विसर्जन घाटावरील केलेली पूर्व तयारी पाहता भिवंडी महानगपालिका असो वा इतर जिल्ह्यातील पालिका प्रशासन असो या सर्वांना प्रेरणादायी व लाजवेल असे काम त्यांनी केले आहे।

यासाठी त्यांना नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मालोजी शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी मोलाची साथ दिली आहे.त्यामुळे दीड दिवसांच्या गणपती पासून ते आज पर्यंत गणेश घाटावरील सोयी सुविधा मध्ये वाढ होताना दिसत आहे.त्यांनी सजवलेलं व डेकोरेट केलेलं समुद्र किनाऱ्या पासून ते ४० ते ५० फूट अंतरावर गणेश मूर्ती चालत घेऊन जाऊन तेथे कोणत्याही प्रकारची गर्दी न करता अगदी सहज प्रवेश केला जातो. व राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे हा उद्देश समोर ठेऊन गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात.विशेष म्हणजे वार्ड क्रं.१ ते वार्ड क्रं.६ मध्ये वेगवेगळे टेबल माडण्यात आले आहेत.व प्रत्येक वार्ड साठी दोन निरीक्षक नेमले आहेत जेणे करुन प्रत्येक वार्ड मधील गणेश मूर्ती ही नेमणूक केलेल्या निरीक्षकाच्या ताब्यात दिली जाते.जेणे करून गर्दी होत नाही.नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.अशा घटनेमुळे काल्हेर ग्रामपंचायतीचे नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे असे म्हणायला वावगे ठरू नये.त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महानगर पालिका प्रशासनाने काल्हेर ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा व येणाऱ्या काळात सुधारणा कराव्यात याच सदिच्छा।


Bundelikhabar

Related posts

श्रमजीवी संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Bundeli Khabar

“Gansaraswati” Award Announced to Anuradha Kuber

Bundeli Khabar

प्राजक्ता चौधरी ठरल्या ‘नारी तू नारायणी रत्न’ पुरस्कार विजेत्या

Bundeli Khabar
error: Content is protected !!