22.6 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210917 WA0000
महाराष्ट्र

माटलवाडी युवा प्रतिष्ठाण तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Bundelikhabar

माटलवाडी युवा प्रतिष्ठाण कडून दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप.

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : माटलवाडी युवा प्रतिष्ठाण च्या वतीने दरवर्षीप्रमाणे गुहागर तालुक्यातील जि.प.आदर्श शाळा कुंडली नंबर ३ माटलवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.आपल्या गावातील ग्रामीण भागातील शालेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी व आपल्या शालेतील विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या शैक्षणिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण आपल्या गावातील शाळांपासून सुरूवात करायला हवी यासाठी माटलवाडी युवा प्रतिष्ठाण गेल्या सात वर्षापासून गणेशोत्सव दरम्यान आपल्या गावी शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत असे माटलवाडी युवा प्रतिष्ठाण यांच्याकडून सांगण्यात आले.यावेळी शिवराम थोरसे, गंगाराम माटल, यशवंत बोरसे, नारायण माटल,यशवंत थोरसे, नितीन माटल यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड, प्रमोधनी गायकवाड आणि माटलवाडी युवा प्रतिष्ठाण चे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते।

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रतिवर्षी हातभार लावण्यासाठी हे प्रतिष्ठान घेत असलेले कष्ट पाहून समाधान वाटले. सर्व पदाधिकारी यांचे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समिती तर्फे मनःपूर्वक आभार शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी व्यक्त केले।


Bundelikhabar

Related posts

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

Bundeli Khabar

पोलादपूर तालुका पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गौरी गणपती विसर्जनात वाहतूक कोंडी टळली

Bundeli Khabar

सरपंच सौ.वैशाली थळे, यांच्या नेतृत्वाखाली, कशेळी शिवसेना महिला आघाडीची विशेष सभा संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!