28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210915 WA0056
महाराष्ट्र

मोठ्या भक्तिभावाने पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

Bundelikhabar

हे बाप्पा पालिकेच्या अधिकाऱ्यांना खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्याची सद्बुद्धी दे भक्तांनी केला नवस.

संदीप शेंडगे/ महाराष्ट्र
मोहोने : पाच दिवसांच्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीचे जड अंतकरनाने उल्हास नदी येथे विसर्जन करण्यात आले. मात्र गणरायाच आगमन आणि विसर्जनाच्या वेळी भक्तांना आणि नागरिकांना रस्ते खराब असल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मोहोने, बल्यानी, अटाळी, एन आर सी कॉलनी, तरे मार्केट आदी ठिकाणच्या रस्त्यांची भयावह स्थिती झालेली असून रस्त्यांवर खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे।

गणेशोत्सव सुरू होण्याआधी पत्रकार मंडळीनी कडोमपाच्या नगर विकास खात्याला रस्ते दुरुस्त करण्यासाठी निवेदन ही दिले असताना ही रस्त्यांची डागडुजी झाली नाही. एकीकडे स्मार्ट सीटी होऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला रस्त्यांची दुरुस्ती करायला वेळ नाही यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते नगरविकास खाते आहे की नगर भकास खाते आहे असा नागरिकांना पडला आहे।

रस्त्यांवर सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमधून कसेबसे गणरायाला सावरून भाविकांनी, गनरायाने निरोप घेतल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. अ प्रभाग क्षेत्रातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून अनेक भक्तांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुबुद्धी दे रस्ते चांगला करू दे असा नवस आपल्या गणराया समोर करावा लागला।


Bundelikhabar

Related posts

कांदिवली विधानसभा क्षेत्रातील क्रांतीनगर जीवनधारा संघाच्या नविन कार्यालयाचे उदघाटन संपन्न

Bundeli Khabar

मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्याय आणि पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा

Bundeli Khabar

मुंबै बँक निवडणुकीचे निकाल जाहीर

Bundeli Khabar
error: Content is protected !!