33.2 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » वसईच्या नागले गावातील “यश”
महाराष्ट्र

वसईच्या नागले गावातील “यश”

वसई (गुरुदत्त वाकदेकर) : संपूर्ण भारतातून एनसीसी कॅडेटचे शिबिर ग्वालियर, मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात पालघर जिल्ह्यातून वसई तालुक्यातील नागले गावातील यश अनिल पाटील यांनी संत गोंसलो गार्सिया महाविद्यालयाच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातून २८ व संपूर्ण भारतातून २४८ एनसीसी कॅडेट्स यात सहभागी झाले होते. यश याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत “खडक चढणी व गोळीबार” स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. शिबिरात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची संस्कृती यावर आधारित कार्यक्रम झाला.

डिजी एनसीसी लेफ्टनंट जनरल गुरबिरपाल सिंग यांनी प्रेरणादायी विचार सर्व सहभागी एनसीसी कॅडेट्स समोर व्यक्त केले. सदरचे एनसीसी शिबिर हे कर्नल अरविंद दास यांच्या निरीक्षणाखाली पार पाडले. छोट्याशा गावातील एक हुशार मुलगा देश पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो ही नक्कीच नागले वासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्व स्तरातून “यश”च्या यशाचं कौतुक होत आहे.

Related posts

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे नसांच्या आरोग्यावर परिणाम : पीऍण्डजी नर्व्ह हेल्थ सर्व्हे

Bundeli Khabar

मनसे विधायक प्रमोद (राजू) पाटिल द्वारा तीन वार्डों में भूमि पूजन

Bundeli Khabar

‘रंजू की बेटियां’ टीवी शो में गुड्डू मिश्रा और रंजू की दोबारा शादी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!