41.4 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » घाटकोपर प्रकल्पअंतर्गत सही पोषण देश रोशन कुपोषण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
महाराष्ट्र

घाटकोपर प्रकल्पअंतर्गत सही पोषण देश रोशन कुपोषण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

कुपोषनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सकस आहार वेळेवर देण्याची गरज – प्रतापराव पाटील
घाटकोपर प्रकल्पअंतर्गत सही पोषण देश रोशन कुपोषण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : (मणिलाल शिंपी) घाटकोपर बाल विकास सेवा योजना प्रकल्प 1 एकात्मिक कार्यालयामार्फत “पोषण माह २०२१”निमित्त सही पोषण देश रोशन या संकल्पनेनुसार विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहीम ही प्रकल्प अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.स्नेहा डोके, अंगणवाडी मुख्यसेविका सौ. संगीता मणिलाल शिंपी ,सौ.वैशाली शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भटवाडी डोंगर परिसर या ठिकाणी राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रमाचे आयोजन सदर बीट मधील अंगणवाडी सेविकांनी केले होते।

घाटकोपर १ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये पोषण माह सप्ताह २०२१ ‘या उपक्रमाला सुरुवात झाली असून विशेषतः या प्रकल्पांतर्गत सहा बीट असून प्रत्येक बीट मार्फत या संपूर्ण महिन्यात विविध उपक्रम राबवून “माझे मुल माझी जबाबदारी”सही पोषण देश रोशन यासारखे उपक्रम राबविण्यात येणार असून पोषण अभियान ही जनजागृती होण्यासाठी तसेच सक्षम माता सदृढ बालक महाराष्ट्रात घडावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अंगणवाडी सेविकांनी आपल्या परिसरातील किशोरी मुली, कुपोषित मुलं आणि गरोदर माता यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांना वेळेवर माहिती व आहार दिला तर कोणत्याही प्रकारे कुपोषित बालके असल्याची तक्रार येणार नाही त्यामुळे माझ्या वतीने आपना सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्य सेविका यांना आवाहन आहे की आपल्या परिसरातील प्रत्येक घटकातील, स्तरातील, जनसामान्य लोकांपर्यंत पोषण आहार सप्ताह ची माहिती देऊन कुपोषण या संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत असे यावेळी प्रकल्प अधिकारी श्री.प्रतापराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच डॉक्टर स्नेहा डोके यांनी लहान बालकांमधील कुपोषित पणा येण्याची कारणे सांगून सकस आहाराचे महत्व पटवून दिले तसेच गरोदर मातांनी नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून आपल्या नवजात बालकाची योग्य ती काळजी घ्यावी आणि सदृढ बालक जन्माला येण्यासाठी स्वतःची काळजी घ्यावी असे सांगितले।

यावेळी भटवाडी हिल, पारवाडी या परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सकस आहारावर आधारित भारूड सादर केले व स्रीभून हत्या या विषयावर पथनाट्य सादर केले, तसेच कुपोषण स्रीभून या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाच्या विविध उपक्रमांबाबत आणि पोषण आहार माह सप्ताह यशस्वी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त जनजागृती घडवून आणण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून आम्ही विशेष मोहीम राबवणार असल्याचे मुख्य सेविका सौ.संगीता शिंपी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका प्रिया माळकर यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार मुख्य सेविका वैशाली शिंदे यांनी मानले सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली।

Related posts

या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे:खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

Bundeli Khabar

युवा सामर्थ्य प्रतिष्ठान यांच्या तर्फे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम संपन्न

Bundeli Khabar

राजेश विष्णू वाघमारे यांचा आज 29 जुलै रोजी वाढदिवस यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा अल्पपरिचय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!