38.8 C
Madhya Pradesh
April 30, 2024
Bundeli Khabar
Home » राजेश विष्णू वाघमारे यांचा आज 29 जुलै रोजी वाढदिवस यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा अल्पपरिचय
महाराष्ट्र

राजेश विष्णू वाघमारे यांचा आज 29 जुलै रोजी वाढदिवस यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा अल्पपरिचय

मुम्बई / संदीप शेंडगे
आंबिवली : राजेश वाघमारे हे नाव मोहने शहरांमध्ये सर्वांनाच परिचित असे नाव आहे.
वडील विष्णू वाघमारे हे काँग्रेस पक्षाचे माजी मोहने शहर अध्यक्ष असल्यामुळे घरामध्ये राजकीय वातावरण लहानपणापासूनच त्यांनी अनुभवले आहे. त्यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असली तरी त्यांनी समाजामध्ये आपली स्वतः ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्पावधीतच त्यांनी कल्याण-डोंबिवली शहरातील तरुण वर्गात अत्यंत लोकप्रिय स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या लोकप्रियते मुळेच संपूर्ण अ प्रभाग क्षेत्राची म्हणजेच (शहाड मोहने टिटवाळा) या ब्लॉक अध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने मोठ्या हिमतीने त्यांच्याकडे सोपविली आहे. आणि ते आजही त्या पदावर विराजमान आहेत.
राजकीय वारसा जरी वडिलांकडून त्यांना मिळाला असला तरी त्यांची राजकारणात खरी ओळख २००७ सालापासून सुरू झाली।

यह भी पढ़ें-नाइजीरिया की एक साल की बच्ची का भारत मे सफल सर्जरी

सचिन पोटे कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेस शहर जिल्हाअध्यक्ष असताना राजेश यांच्याकडे युवक काँग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हाउपाध्यक्ष या पदाची जबाबदारी सचिन पोटे यांनी सोपविली. वरिष्ठांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची जाणीव ठेवून त्यांनी पक्षवाढीसाठी धडाडीने काम सुरू केले. या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी लीलया पार पाडत राजेश यांनी पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक युवकांनी त्यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला अनेक कार्यकर्ते पक्षांमध्ये जोडली गेली. ज्यांनी पक्षाचे काम थांबविले होते त्यांनीही पक्षात काम करायला सुरु केली. पक्षातील मरगळ दूर करण्याचे काम राजेश यांनी सातत्याने सुरूच ठेवले।


याचवेळी कल्याण पश्चिम विधानसभेची पक्षांतर्गत निवडणूक होऊन मोठ्या बहुमताने राकेश मुथा यांची कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष या पदावर निवड झाली. तर कल्याण पश्चिम विधानसभा युवक सेक्रेटरी या पदावर राजेश वाघमारे यांची देखील बहुमताने निवड झाली. याच पदामुळे काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते व युवकांशी त्यांचे थेट संबंध निर्माण झाले अल्पावधीतच त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण केले, आणि कल्याण डोंबिवली शहरांमध्ये काँग्रेसला एक अभ्यासू व आक्रमक चेहरा मिळाला असल्याचे बोलले जाऊ लागले.


त्यांच्या कामाची पद्धत अभ्यासू व आक्रमक आहे.
त्यांच्या कामाची पद्धत पाहून दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून दीपक भाऊ सामाजिक संघटनेच्या मोहने शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी राजेश यांच्याकडे सोपविण्यात आली.
त्यांनी संघटनेचे काम जोरदारपणे सुरू ठेवले. अनेक युवकांना दीपक भाऊ संघटनेमध्ये जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यांच्या कार्याची दखल घेत स्वतः दीपक भाऊ निकाळजे यांनी त्यांना आपल्या कार्यालयात बोलवून स्वतःच्या हस्ते कल्याण शहराच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आणि इथून त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली।


मध्यंतरीच्या काळात कल्याण पश्चिम विधानसभेत येत असलेल्या मोहने शहाड टिटवाळा या ब्लॉक अध्यक्ष पदाचा पेच निर्माण झाला. जुने आणि नवीन कार्यकर्ते यामध्ये ताळमेळ बसत नव्हता. जुने आणि नवीन यांच्यामध्ये कोण अध्यक्ष होणार यावर एकमत होत नसल्याने अध्यक्षपद कोणाकडे सोपवायचे याचा गांभीर्याने विचार करीत होता. राहुल गांधी यांच्या आदेशानुसार वरिष्ठांनी तरुणवर्गाला प्राधान्य देण्याचे ठरविले. पक्षाला एक नवीन आक्रमक आणि पक्ष पुढे घेऊन जाणारा चेहरा आवश्यक होता. त्यातच राजेश यांचे नाव पुढे आले. जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी देखील त्यांच्या नावाला दुजोरा दिला आणि पक्षाने सारासार विचार करून काँग्रेस पक्षाची ब्लॉक अध्यक्षपदाची धुरा एका उमद्या तरुणाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते नाव होते राजेश विष्णू वाघमारे यांचे।


राजेश यांच्याकडे मोहने ब्लॉक शहर अध्यक्षपदाची महत्वाचे जबाबदारी आली आणि त्यांनी आपल्या अगोदरच्या पदाच्या अनुभवाच्या जोरावर ती जबाबदारी लीलया पार पाडली. आजही ते या पदावर विराजमान आहेत.
राजेश वाघमारे यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम केले यामध्ये दीपक भाऊ सामाजिक संघटनेच्या वतीने शांताराम पाटील शाळा येथे १० हजार वह्या वाटपाचा भव्य कार्यक्रम केला।


अनेकांची शासनाच्या दिरंगाईमुळे रखडलेली कामे राजेश यांनी सोडविले. प्रभागांमध्ये साफसफाई असो गटारे नाले नवीन बनविणे असो त्यांची स्वच्छता करणे असो ते कोणत्याही कामाला नाही बोलत नसत अधिकाऱ्यांना थेट जाब विचारून काम करून घेण्याची शैली वेगळीच आहे. त्यांची आक्रमक शैली पाहून अनेक अधिकाऱ्यांना आजही घाम फुटतो।


कल्याण-डोंबिवली शहरातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्याने जरी फोन केला तरी ते फोन उचलून त्याची समस्या जाणून घेतात, योग्य ती मदत करतात मार्गदर्शन करतात त्यामुळेच त्यांनी तळागाळातील अनेक कार्यकर्ते आपल्याशी जोडून ठेवले आहेत. त्यांच्यासोबत सलोख्याचे संबंध निर्माण केले आहे. कोणत्याही कार्यकर्त्याने ॲम्बुलन्स साठी उपचाराकरिता बेड मिळण्याकरिता मदत मागितल्यास अर्ध्या रात्री त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत केली आहे आणि आजही सुरू आहे।


एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचे दवाखान्याचे आलेले भरमसाठ बिल भरण्याची ऐपत नसेल तर त्या दवाखान्याच्या डॉक्टरशी संपर्क थेट संपर्क साधून स्वतः बोलून दवाखान्या चे बिल अनेक जणांचे बील माफ केले आहे. आजही त्यांची सेवा अखंडितपणे सुरूच आहे।
महागाईने कळस गाठला असताना त्यातच चिकन मटण विक्रेत्यांनी चिकन आणि मटनाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढवले होते या विरोधात राजेश यांनी आंदोलन करून भाव कमी करायला विक्रेत्यांना भाग पाडले होते. पीडित मनीषा वाल्मिकी या तरुणीला न्याय मिळावा म्हणून मोठे आंदोलन काँग्रेस पक्ष मार्फत उभारले होते. खाजगी शाळांच्या फी वाढ संदर्भात शाळेशी पत्रव्यवहार करून खाजगी शाळांना फी कमी करण्यास भाग पाडले होते. कल्याण शिधावाटप अधिकारी गोरगरिबांचे रेशनिंग संबंधित कामे करीत नसल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या तसेच नागरिकांच्या हक्काचे रेशन त्यांना मिळत नसल्याने त्यांनी कल्याण रेशनिंग कार्यालयावर भव्य मोर्चा देखील काढला होता. भीमा कोरेगाव प्रकरणात संपूर्ण मोहोने शहर बंद करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी राजेश वाघमारे आणि त्यांच्या सहकार्‍यांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी समाजासाठी असे हजार गुन्हे मी स्वतः घ्यायला व करायला तयार आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठेवलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बुद्ध भीम गीतांचा बादशाह स्वरसम्राट आनंद शिंदे यांच्या भीम गीतांचा भव्य कार्यक्रम काँग्रेस युवक आघाडी तर्फे घेतला होता याचे श्रेयहि त्यांनाच जाते।


गेल्या मार्च महिन्यात लॉक डाऊन सुरू झाला आणि अनेकांचे संसार रस्त्यावर आले अनेकांचे रोजगार बंद झाले वाहतुकीचे कोणतेही साधन नसल्याने नागरिकांची उपासमार सुरू झाली. शासनाकडून येणारी तुटपुंजी मदत अपुरी पडू लागली. यावेळेस राजेश वाघमारे यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण अ प्रभाग क्षेत्रात आपल्या कार्यकर्त्यांमार्फत नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सलग दोन महिने मोफत अन्न वाटप करण्यात आले यामध्ये बाबा मोरे नगर, तक्षशिला नगर, सम्राट अशोक नगर, धम्मदीप नगर, आदिवासी वाडी, गणेश कॉलनी, महात्मा फुले नगर, जेतवन नगर, समता मार्ग आदी भागांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमार्फत तर कधी स्वतः जाऊन अन्नदान वाटप केले. त्यांच्या कामाच्या पद्धतीचा एक दोन किस्से तुम्हाला सांगतो..
आपल्या मोहोण्यातील अशोक खेत्रे यांनी त्यांना फोन केला आणि सांगितले साहेब कोनगाव टोल नाक्याजवळ २५० ते ३०० कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी आले आहेत. रावटी मध्ये रस्त्यालगत राहत आहेत. ते मुक्ताई नगर, जळगाव आणि बीड मधील शिरुस कासार तालुक्यातील आहेत. परंतु लॉकडाऊन मुळे त्यांना अन्न आणि पाणी देखील प्यायला मिळत नाही आणी गावी जायला त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाहीत. त्यांना कोणी मदत करत नाही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही काहीतरी करा।


लागलीच दुसऱ्याच दिवशी वाघमारे यांनी स्वतः त्याठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यां सह तेथे गेले तेथील सरपंच यांना बोलावुन घेतले त्यांची दोन वेळची जेवणाची आणि पाण्याची सोय करून दिली. आठ दिवसांनी त्यांना गावी पाठवण्याची व्यवस्था केली।
दुसरा किस्सा असा की, आष्टी तालुक्यातील कडा साखर कारखाना येथील नंदी बैल यांचा खेळ करणारी मंडळी कल्याण बैलबाजार येथे वास्तव्यास राहून त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. एका रात्री त्यांचा नंदी बैल रात्री चोरीला गेला नंतर त्याला कोणीतरी ठार मारले असल्याचे समजले त्याचे अवशेष सापडले परंतु आरोपी मिळाले पोलीस गुन्हे दाखल करून घेत नव्हते हे प्रकरण आमदार नरेंद्र पवार यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी वाघमारे यांना सांगितले व त्यांची जमल्यास भेट घ्यावी वाघमारे साहेबानी दुसऱ्याच दिवशी त्या गावी जावुन त्या लोकांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पोलीस प्रशासन गुन्हा नोंदवत नव्हते त्यावेळेस स्वतः बाजारपेठ कल्याण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवून घेतला व तपास करून आरोपीना दोनच दिवसात अटक करण्यास भाग पाडले मी स्वतः याचा साक्षीदार आहे. लॉक डाऊनच्या संघर्षमय काळात आपल्या कार्यकर्त्यांना मिळेल ती मदत त्यांनी केली आहे।


कार्यकर्त्यांचे पाठबळ आपली स्वतःची आक्रमक शैली मनमिळावू स्वभाव अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे पोलीस स्टेशन असो कोर्टकचेरी असो कार्यकर्त्याची कधी साथ न सोडणाऱ्या या काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।

Related posts

ऑल इंडिया युथ फेडरेशन च्या राज्याध्यक्षपदी कॉ. भाऊराव प्रभाळे यांची बिनविरोध निवड

Bundeli Khabar

वावे येथील नदीवरील पूल खचल्याने वाहतूक बंद

Bundeli Khabar

लघुवाद न्यायालयात संविधान दिनी शोभायात्रा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!