21.8 C
Madhya Pradesh
September 17, 2024
Bundeli Khabar
Home » युवा सामर्थ्य प्रतिष्ठान यांच्या तर्फे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम संपन्न
महाराष्ट्र

युवा सामर्थ्य प्रतिष्ठान यांच्या तर्फे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम संपन्न

डॉ.दिपेश पष्टे/महाराष्ट्र

युवा सामर्थ्य प्रतिष्ठान जव्हार यांचे तर्फे व्हिजन ऑफ पिपल्स हेलपिंग सोसायटी या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने जव्हार मध्ये शनिवार दि. ११ सप्टेंबर व १२ सप्टेंबर २०२१ रोजी विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी “आरोग्य शिबीर ” आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आपले मानवाधिकार फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पॅनकार्ड काढण्यासाठी देखील विशेष शिबिर दि. १०,११ व १२ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ आत्तापर्यंत जवळजवळ ३५० व्यक्तींनी घेतला आहे.

त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी खास शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर दि ११ व १२ सप्टेंबर २०२१ रोजी होते. हे सर्व उपक्रम संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय, पंडित नेहरू चौक,जव्हार अर्बन बँके समोर जव्हार येथे आयोजित केले होते. या शिबिरासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा सामर्थ्य प्रतिष्ठान, जव्हार च्या वतीने अध्यक्ष मुकेश रघुनाथ वातास यांनी केले होते.

Related posts

दोनों भाई बहन पिंपरी-चिंचवड़ और पुणेवासियों की सेवा के लिए तैयार

Bundeli Khabar

The only curiosity of Swag Fashion Week

Bundeli Khabar

१५ अगस्त स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी पूर्वसंध्येला ७५ फळ झाडांची लागवड

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!