22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » महाड तालुका रहिवासी संघ पुणेतर्फे महाड पूरग्रस्त भागात शैक्षणिक साहित्य वाटपला प्रारंभ
महाराष्ट्र

महाड तालुका रहिवासी संघ पुणेतर्फे महाड पूरग्रस्त भागात शैक्षणिक साहित्य वाटपला प्रारंभ

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : कोकणात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाडसह संपूर्ण कोकणात अनेक ठिकाणी महापूर आला होता.या महापुरानं परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान केलं आहे.अनेकांच्या डोक्यावर राहायला छप्पर देखील उरलं नाही.आता कुठे पुरस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे.महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांकडून वेगवेगळ्या पध्दतीची मदत पूरग्रस्त भागात पोहचली जात असून महाड रहिवासी संघ पुणेच्या वतीने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य संच पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन देण्यात आली.यामध्ये महाड शहरातील सुकट गल्ली तांबट आळी येथील १३०विद्यार्थ्यांचा समावेश होता।


महाड तालुका रहिवासी संघ पुणेतर्फे मागील दहा दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्थेच्या सदस्य, ओळखीच्या व्यक्ती, उद्योजक, नातेवाईक व मित्र परिवार मदतीसाठी आवाहन केले असून विशेष मोहीम राबवून काही रक्कम जमा केली होती जमा झालेली सर्व रक्कम एकत्र करून करून त्यांचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले.त्यामध्ये शालेय दप्तर, पुस्तके, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेचे साहित्य, पेन्सिल बॉक्स, पेन बॉक्स असे एका विद्यार्थ्यांला वर्षभर पुरेल असा संच देण्यात आला.पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक सेवाभावी संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र वंचित राहू नये म्हणून महाड तालुका रहिवासी संघाने शैक्षणिक साहित्य वितरणाची मोहीम हाती घेतले असल्याचे महाड तालुका रहिवासी संघाचे कार्याध्यक्ष रुपेश पार्टे यांनी सांगितले.यादरम्यान उद्योजक धनंजय साठे, महाड तालुका रहिवासी संघ कार्याध्यक्ष रुपेश पार्टे, रत्नेश जाधव, सतीश मोरे यांच्यासह अनेकांननी पुढाकार घेतला आहे।

Related posts

मध्य रेल एवं एनडीआरएफ का संयुक्त मॉकड्रिल

Bundeli Khabar

सोने की बिस्किट नकली,धोखाधड़ी का मुकदमा दर्ज

Bundeli Khabar

जिल्हयातील पूनर्वसन कामास वेग

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!