21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » जिल्हयातील पूनर्वसन कामास वेग
महाराष्ट्र

जिल्हयातील पूनर्वसन कामास वेग

1 कोटी 78 लाख रुपयांहून अधिक मदतीचे वाटप
महाराष्ट्र/संभाजी मोरे
रत्नागिरी : चिपळूण आणि खेड तालुक्यात आलेल्या पुरानंतर मोठया प्रमाणावर बचाव आणि स्चच्छता करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. आता यातील बाधितांच्या पूनर्वसन करण्याच्या कामास गती देण्यात आली आहे. मृतकांचे वारस यांना प्रत्येकी 4 लाख रुपये तसेच भांडे व कपडे यासाठी बाधितांना तातडीची मदत म्हणून 85 लाख 45 हजार रुपये आणि जखमींना 91 हजार 800 रुपये मदत दिली असे एकूण 1 कोटी 78 लाख 36 हजार 800 रुपये मदत वाटप करण्याचे काम प्रशासनाने केले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी दिली।
खेड तालुक्यात पोसरे येथील भुस्खलन दुर्घटनेत 17 व्यक्ती मरण पावल्या त्यापैकी 14 जणांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 56 लाख रुपयांची मदत देण्यात आली तर बिरमणी दुर्घटनेतील 2 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्यात आले।
चिपळूण तालुक्यात 5 जणांचा मृत्यू झाला यात 20 लाख रुपये मदत देण्यात आली आहे. पूराने बाधित 1769 कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 88 लाख 45 हजारांची मदत देण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त पोसरे दुर्घटनोतील जखमी 17 व्यक्तींना 73 हजार 100 रुपये तर पेढे परशूराम येथील एका जखमी व्यक्तीस 12 हजार 700 रुपये मदत देण्यात आली आहे।


जुलै 2021 अतिवृष्टी व पूरपरिस्थीतीमुळे झालेले नुकसान
मयत :-

मृतसंख्या – 33 (12 बुडून मयत व 21 दरड कोसळून मयत)
आवश्यक अनुदान – 132 लाख (प्रती मृत व्यक्ती 4 लाख प्रमाणे)

    वितरित अनुदान  - लेखाशिर्ष 22450155 अंतर्गत मृत, जखमींसाठी उणे प्राधिकाराची सुविधा उपलब्ध असल्याने अनुदान उणे पध्दतीने काढण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

जखमी :- जखमींची संख्या – 18
आवश्यक अनुदान – 1 लाख 53 हजार (चिपळूण 1 प्रकरणात रु. 12 हजार 700 व खेड 17 जखमींपैकी 8 प्रकरणात 12 हजार 700 प्रमाणे 1 लाख 1 हजार 600 व 9 प्रकरणात 4 हजार 300 प्रमाणे 38 हजार 700 असे एकूण 1 लाख 53 हजार रुपये.

पशुधन :- नुकसान
मोठे दुधाळ – 521,लहान दुधाळ – 202,ओढकाम करणारे मोठे – 83,ओढकाम करणारे लहान – 163,कुक्कुटपालन – 4553 कोंबडया,आवश्यक अनुदान – 211.47 लाख

हस्तकला कारागिरांचे नुकसान:

हत्यारे/अवजारे नुकसान – संख्या – 24,आवश्यक निधी – 98 हजार 400,कच्चा मालाचे नुकसान – संख्या – 24,आवश्यक निधी – 98 हजार 400

कपडे/भांडी नुकसान:

बाधित कुटुंबांची संख्या – 13108,आवश्यक अनुदान – रु.655.40 लाख (उणे पध्दतीने प्रति बाधित कुटुंब रु.5000/- प्रमाणे अनुदान काढण्याची तजवीज ठेवण्या आली आहे.)

पडझड झालेली घरे :-

पूर्णत: पक्की/कच्ची पक्की 59 व कच्ची 51 एकूण 110, प्रत्यक्ष नुकसान – रु.438.98 लाख, आवश्यक अनुदान – रु.104.61 लाख (रु.95100/- प्रति घर प्रमाणे), अंशत: पक्की/ कच्ची – पक्की 1486 व कच्ची 1336 एकूण 2822, प्रत्यक्ष नुकसान – रु.2325.75 लाख, आवश्यक अनुदान – रु. 169.32 लाख (रु.6000/- प्रति घर प्रमाणे)

झोपडया:-

एकूण नुकसान – 67, प्रत्यक्ष नुकसान- रु.9.90 लाख, आवश्यक अनुदान – रु. 4.02 लाख ( रु.6000/- प्रति झोपडी प्रमाणे)

गोठे:

एकूण नुकसान – 370,प्रत्यक्ष नुकसान – रु.477.60 लाख, आवश्यक अनुदान – रु. 7.77 लाख (रु.2100/- प्रति गोठा प्रमाणे), घरासाठी एकूण आवश्यक अनुदान – रु.285.72 लाख, मदत छावण्या,संख्या – 68, सुरु करण्या, आलेल्या दिवसाची सरासरी – 15 दिवस, एका दिवसाला छावण्यात असणारे सरासरी लोक – 2493, एकूण खर्च – रु. 73.15 लाख, प्राप्त अनुदान – रु. 1 कोटी, कचरा उचलणे, बाधित गावे 21, प्राप्त अनुदान – रु.1 कोटी

मत्स्य विभाग

नुकसान – 1. अंशत: होडी – 4, पूर्णत होडी-6, अंशत: जाळी-4, पूर्णत जाळी -7, मत्स्यशेती -0.10 हे.आर.

एकूण आवश्यक अनुदान – रु.1.0142 लाख

शेती:- नुकसान

शेत जमीन खरडणे/खचणे – क्षेत्र 190.75 हे.आर.

शेत जमिनीवर गाळ साचून नुकसान – क्षेत्र 480.86 हे.आर

आवश्यक अनुदान – शेत जमीन खरडणे/खचणे – रु.71.53 लाख (रु.37500/- प्रति हे.आर. प्रमाणे )

शेत जमिनीवर गाळ साचून नुकसान – 56.23 लाख
(रु.12200/- प्रति हे.आर. प्रमाणे )

, एकूण आवश्यक अनुदान – रु.127.76 लाख

सार्वजनिक मालमत्ता नुकसान

महावितरण – 344 लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग – 13105.15 लाख, राष्ट्रीय महामार्ग – 1470 लाख, जिल्हा परिषद – 7469.72 लाख, वन विभाग – 34.84 लाख, पोलीस विभाग – 39.76 लाख, पाटबंधारे विभाग – 1146 लाख, नगरपालिका/नगरपरिषद – 5377 लाख, एसटी महामंडळ – 326.49 लाख असे एकूण 29312.96 लाख.

वाहनांची नुकसान – दुचाकी व चार चाकी वाहने 4854 (चिपळूण), 25 (खेड)

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 02 ऑगस्ट 2021 पर्यंत दिलेली मदत

धान्य वाटप – गहू – 175 क्विंटल, तांदूळ – 175 क्विंटल, वाटप केलेली बाधित गावे – 200, वाटप केलेली बाधित कुटुंब 1751

शिवभोजन थाळी वाटप – ऑनलाईन – 25982 ऑफलाईन – 2141

केरोसीन वाटप 1810 लिटर
वाटप केलेली बाधित गावे .44
वाटप केलेली बाधित कुटुंब – 362

स्वच्छता व आरोग्य
चिपळूण व खेड नगरपालिकांमध्ये व ग्रामीण परिसरामध्ये स्वच्छतेचे काम हाती घेण्यात
आले असून चिपळूण व परिसरात 70 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच खेड व
परिसरात 100 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

  • चिपळूण खेड व परिसरातील पाणीपुरवठा व वीजपुरवठा 100 टक्के पूर्ववत करण्यात

आला आहे.

पुरानंतरची स्थिती व नियंत्रण:-

चिपळूण व खेड नगरपालिका व परिसरातमध्ये पूर स्थिती ओसरल्यानंतर साथीचे रोग होऊ

नये म्हणून निर्जतूकीकरण करण्यात आले आहे. घरोघरी जावून साथीच्या रोगाच्या व डेंग्यू व लेप्टोस्पायरॉसिसच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

१. पाणी शुध्दिकरण

२. घरोघरी मेडिक्लोअरचे वाटप

साथीच्या रोगासंबंधी जनजागृती व उपचार

४. जंतूनाशक फवारणी व ब्लिचिंगाडिटीटी चे फॉगिंग

चिपळूण – चिपळूण शहर व परिसरामध्ये आरोग्य तपासणीसाठी 34 पथके नियुक्त करण्यात

आली आहेत. आता पर्यत 21322 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यामध्ये 66040

लोकांचा समावेश आहे. एकूण 86940 क्यॅप्सूलचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी लक्षणे

असणा-या 14490 रुग्णांना क्वॅप्सूल, डॉक्सी -प्रॉफिलॅक्सीसचे वाटप करण्यात आले आहे.

तपासणी करण्यात आलेले रुग्ण- 21837

खेड- खेड शहर व परिसरामध्येसुध्दा तपासणी व औषधांचे वाटप सुरु असून 5 पथके कार्यरत

आहेत.

सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तीकडून मदत-

एकूण सामाजिक संस्था- 113

दानशूर व्यक्ती-25

Related posts

केडीएमसी क्षेत्र में डिस्चार्ज हुए ६६ मरीज, मिले ८९ नए मरीज

Bundeli Khabar

अलग अलग दलों के सैकड़ों कार्यकर्ताओं का शिवसेना में प्रवेश

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!