23.3 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » अनैतिक संबधाच्या संशयातून नवविवाहीत पत्नीची हत्या करून मृतदेह जाळणाऱ्या पतीला बेड्या
महाराष्ट्र

अनैतिक संबधाच्या संशयातून नवविवाहीत पत्नीची हत्या करून मृतदेह जाळणाऱ्या पतीला बेड्या

किशोर पाटील/महाराष्ट्र
उल्हासनगर : परपुरुषाशी अनैतिक संबधाच्या संशयातून नवविवाहीत पत्नीची हत्या करून मृतदेह जाळणाऱ्या पतीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने १३ दिवसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा येथे २२ ऑगस्ट रोजी घडली होती.
परपुरुषाशी अनैतिक संबधाच्या संशयातून नवविवाहीत पत्नीची हत्या करून मृतदेह जाळणाऱ्या पतीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने १३ दिवसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा येथे २२ ऑगस्ट रोजी घडली होती. सुरज आंनद खरात (वय.२६ वर्ष) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर सुशिला उर्फ (काजल) निकाळजे (वय २५ वर्ष ) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे।

परकरच्या लेसने आवळला गळा; तर हत्या करून फरार झाला होता
मृत सुशिला उर्फ (काजल) हिचा दीड महिन्यापूर्वीच आरोपी पती सूरज सोबत अंबरनाथच्या एका मंदिरात लग्न केले होते. त्यांनतर गायकवाड पाडा येथे एका भाड्याच्या खोलीत सुरज सोबत रहात होती. त्यातच मृत पत्नीला दारुचे व्यसन जडले होते, तसेच परपुरुषांशी अनैतिक संबध असल्याच्या संशयावरुन दोघांमध्ये वाद होत होते. असाच पुन्हा वाद २२ ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी राहत्या घरात रागाच्या भरात तिच्या परकरच्या लेसने गळा आवळून चेहऱ्यावर रॉकेल टाकत तिला जाळून तिची हत्या केली. शिवाय बाहेरुन कुलुप लावून पळून गेला होता.अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या करून पळून गेलेल्या आरोपीस बदलापूरला सापळा रचून अटक -मृत सुशीलाची हत्या करून घराला कुलुप असल्याने कोणाचे लक्ष गेले नव्हते. मात्र खोलीत मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यामुळे घरमालकाने पोलिसांच्या सहाय्याने घराचे दार उघडले असता कुजलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा तिचा मृतदेह मिळून आला होता. तर सुशिलाची हत्या झालेल्या दिवसापासून पळून गेलेला होता. त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करून आरोपीची माहिती काढली असता, तो बदलापूर पूर्व येथील कामगार नाक्यावर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचत सुरज यास ताब्यात घेतले।

कोणताही धागादोरा नसताना अत्यंत हुशारीने तपास –

विशेष म्हणजे कोणताही धागादोरा नसताना अत्यंत हुशारीने तपास करुन त्याचेकडून गुन्हा उघडकीस आणला. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात पत्नीची अनैतिक संबधाच्या संशयातून हत्या केल्याचे सांगितले. कुठलाही धागादोरा नसतांना सुशीलाची हत्या करणाऱ्याला पकडण्याची कामगिरी गुन्हे शाखेने पार पाडली।

Related posts

डॉ सूरज माटे को मिला एम्पावर सोशल एंड एजुकेशन ट्रस्ट द्वारा बिजनेस आइकॉन अवार्ड

Bundeli Khabar

धर्मादाय आयुक्तांची सामाजिक बांधिलकी

Bundeli Khabar

ध्वनि भानुशाली का गाना ‘वास्ते’ यूट्यूब की ग्लोबल टॉप 100 लिस्ट में सम्मिलित

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!