21 C
Madhya Pradesh
February 15, 2025
Bundeli Khabar
Home » धर्मादाय आयुक्तांची सामाजिक बांधिलकी
महाराष्ट्र

धर्मादाय आयुक्तांची सामाजिक बांधिलकी

किशोर पाटील/महाराष्ट्र
रत्नागिरी : महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड व इतर जिल्ह्यांमधे आलेल्या महापुरामुळे तसेच दरड कोसळल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आणि अनेक कुटुंब बेघर झालेली आहेत।

पुरग्रस्थांचे अतोनात नुकसान झालेले आहे, शासन आपल्या परीने पुरग्रस्थांना मदत करत आहेच पण धर्मादाय आयुक्त श्री. प्र. श्रा. तरारे यांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व धर्मादाय संस्थांना या कामी मदत करण्याचे आवाहन केले होते.
सदर आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून रुपये एक कोटी पेक्षा जास्तीची मदत जमा केली आहे त्याचाच एक भाग म्हणून रुपये तेहतीस लाख साठ हजारांचा धनादेश आज मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री विकास खर्गे यांना धर्मादाय आयुक्त श्री प प्रा. श्री . तटारे यांनी सुपूर्द केला।


धर्मादाय आयुक्त विभागाच्या बांधिलकीची सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. एका शासकीय विभागातून पुरग्रस्थांसाठी दाखवलेल्या संवेदनशीलतेसाठी सादर विभाग नक्कीच कौतुकास पात्र आहे. येत्या काळात असेच स्तृत्य उपक्रम करण्याचा मानस श्री. प्र. श्रा. तरारे यांनी या प्रसंगी व्यक्त केला।

Related posts

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मालेगाव येथे सुप्रसिद्ध रांगोळीकार प्रमोद आर्वी यांनी साकारली १०x१५ फुटाची भव्य दिव्य रांगोली

Bundeli Khabar

OLX के नाम पर धोखाधड़ी , मामला दर्ज

Bundeli Khabar

अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडल का C20 एवं G20 में चयन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!