किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : ठाणे जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिम राबविण्यात यावे अशी मागणी पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष व ठाणे युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्या कडे निवेनाद्वारे करण्यात आली आहे।
पर्यावरण संरक्षणासाठी शासन व पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेतर्फे ठाणे जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिम राबविण्यात यावी यासाठी संस्थेतर्फे राष्ट्रीय मार्गदर्शक राजीव पाटील, सल्लागार आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय अध्यक्ष विजय चोघळा, सचिव कुमूद शहाकार, समन्वयक मयूर संख्ये, जिल्हाध्यक्ष डॉ. रेश्मा पाटील यांनी ठाणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे युवक काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली।
पर्यावरण रक्षणासाठी संस्थेतर्फे महाराष्ट्रभर वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांतून वृक्षारोपण मोहिम हाती घेऊन प्रत्येक गावात किमान 10 झाडे लावून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी पर्यावरण उत्कर्ष संस्था व शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी संस्थेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मोहिमेत ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश चौधरी, सरचिटणीस प्रदीप चव्हाण, कार्याध्यक्ष शेखर लोणे संघटक रुपेश पितांबरे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत जाधव, तालुका अध्यक्ष सचिन धामणे, अनंता दळवी, नंदू दिवाणे, दिलीप टेम्बे, सुनील डवले, सहभागी होणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे।