33.4 C
Madhya Pradesh
May 21, 2024
Bundeli Khabar
Home » शिवाजी गोतरणे आणि सुनिल परटोले गुरु-शिष्य विविध पुरस्कारांनी सन्मानीत
महाराष्ट्र

शिवाजी गोतरणे आणि सुनिल परटोले गुरु-शिष्य विविध पुरस्कारांनी सन्मानीत

किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कुंडणपाडा येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक शिवाजी गोतरणे तर जिल्हा परिषद शाळा कळमपाडा येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक सुनिल परटोले या गुरु-शिष्य जोडीला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
या दोन्ही शिक्षकांना शैक्षणिक दीपस्तंभ या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय “दीपस्तंभ शिक्षकरत्न” पुरस्काराने, तर दैनिक ठाणे जीवनदीप वार्ता यांच्या वतीने राज्यस्तरीय “जीवनदीप शिक्षकरत्न” तर सुनिल परटोले यांना रोटरी क्लब ऑफ शहापूर सेंट्रल यांच्या वतीने “नेशन बिल्डर अवार्ड” या पुरकारांनी सम्मानीत करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रातील विवीध उपक्रम,कोरोना काळात ऑनलाइन व ऑफलाइन शैक्षणिक कार्य, एसपी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यू ट्यूब चॅनेलद्वारे राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन,लॉकडाउन काळात शिष्यवृत्ती प्रश्नसंच निर्मिती,कृतिसंशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम लेखन,कृतियुक्त अध्यापन पद्धती या पुस्तक निर्मितीत सहभाग,तंबाखूमुक्त शाळा व प्रेरक म्हणून सहभाग,मिशन स्कॉलरशिप उपक्रमाने केंद्रातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिटमध्ये,शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून जिल्ह्यातील शिक्षकांना मार्गदर्शन,शैक्षणिक साहित्य निर्मिती व विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर सहभाग, विवीध प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका इ.त्यांच्या विवीध शैक्षणिक कार्यामुळे तसेच लॉकडाउन काळात गरीब व गरजू कुटुंबाना विवीध संस्थांच्या माध्यमातून किराणा कीट वाटप,१० वी,१२ वी व विवीध स्पर्धा परिक्षेतील मुलांना विनामूल्य मार्गदर्शन,गरीब ,गरजू मुलांना उच्च शिक्षणासाठी विवीध संस्थांकडून आर्थिक मदत,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन इ.सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर आहे.
यापूर्वीहि त्यांना विवीध पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आले आहे.या सन्मानामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

Related posts

क्रेडिट कार्ड का बिल नहीं भरने के बदले शारीरिक संबंध बनाने की मांग

Bundeli Khabar

साईधाम फिल्पकार्ड लॉजिकस्टीक मध्ये स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मज्जाव :शिवसेनेचा जाब विचारण्यासाठी पुढाकार

Bundeli Khabar

आम्ही फक्त निमित्त आहोत माझ्यासमोर बसलेल्या देवदूतान मुळे हे कार्य घडत आहे – डॉ. मणिलाल शिंपी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!