25.1 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20210830 WA0044
महाराष्ट्र

वांद्रे, पिवळी, कोशिंबडे येथे शिवसेना व युवा सेना शाखांचे उदघाटन

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : शहापूर तालुक्यातील वासिंद-अघई परिसरातील वांद्रे, पिवळी, कोशिंबडे या ग्रामीण भागातील शिवसेना व युवा सेना शाखेचे उदघाटन करण्यात आले।वासिंद ग्रामीण विभाग प्रमुख राजदिप जामदार यांच्या पुढाकार प्रयत्नाने तर कार्यकर्ते रघुनाथ देसले, निवृत्ती मसणे, भगवान वेखंडे यांच्या सहकार्याने शिवसेना व युवा सेना शाखांचे उदघाटन करण्यात आले।


यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, माजी आमदार पांडुरंग बरोरा जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल भेरे, तालुका प्रमुख मारुती धिर्डे, उपजिल्हा संपर्क प्रमुख संतोष शिंदे, माजी सभापती गजानन गोरे, जि.प.सदस्या दिपाली झुगरे, पं.स.सदस्य संदीप थोराड, उपतालुका प्रमुख बंडू शृंगारपुरे, गणेश राऊत, बाळकृष्ण देसले, बाळाराम तरणे, कमळाकर जाधव, विभाग प्रमुख निवृत्ती निपृर्ते, मधूकर पाटील, विश्वास पाटील, माजी उपसरपंच सुधिर देसले, युवा कार्यकर्ते अविनाश शिंगे, राम तरणे, ज्ञानेश्वर मसणे, किरण भानुशाली आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।


दरम्यान, शिवसेनेची कामाची पद्धत पाहूनच मी शिवसेनेकडे ओढलो जाऊन शिवसैनिक, कार्यकर्ते व सर्व सामान्य जनतेसाठी अहोरात्र मदतीसाठी कार्यतत्पर असल्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी म्हटले तर शिवसेनेत जातीपातीचे राजकारण चालत नसून जो निष्ठेने काम करतो त्याचा नक्कीच शिवसेनेत सन्मान होत असल्याचे उपजिल्हाप्रमुख शंकरजी खाडे यांनी स्पष्ट केले.
सदर यामध्ये उपविभाग प्रमुख वामन घरत, वांद्रे शाखा प्रमुख विजय रेरा, पिवळी शाखा प्रमुख महेंद्र भगत, कोशिंबडे शाखा प्रमुख मंगेश बांगर यांची नियुक्ती करण्यात आलीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे व यशवंत राऊत यांनी केले।


Bundelikhabar

Related posts

हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ

Bundeli Khabar

ठाणे के अतिरिक्त पुलिस आयुक्त बने रामनाथ पोक

Bundeli Khabar

आज वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत मुंबई बांद्रा प्रकाश गड कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन

Bundeli Khabar
error: Content is protected !!