25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महा विकास आघाडीचे वर्चस्व कायम
महाराष्ट्र

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महा विकास आघाडीचे वर्चस्व कायम

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीची निवडणूकीत महा विकास आघाडीने वर्चस्व कायम राखले असुन रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत महाविकास आघाडीकडू‌न शिवसेनेचे उमेदवार डाँ.संजय पाटील यांना ९ मते मिळाली तर भाजपचे दयानंद पाटील यांना ८ मते मिळाली.एकूण १८ सदस्य संख्या असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी एक सदस्य गैरहजर असल्याने १७ सदस्यांनी यावेळी मतदान केले।


बाजार समितीच्या सभापती पदाच्या झालेल्या अटी-तटीच्या लढतीत भाजपचा पराभव झाला‌ असुन महाविकास आघाडीचे डाँ.संजय पाटील यांचा एका मताने मताने विजय झाला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांनी नवनिर्वाचित सभापती डॉ संजय पाटील यांचे अभिनंदन केले.यावेळी शिवसेनेचे इरफान भुरे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश गुळवी,मजुर फेडरेशनचे मा.अध्यक्ष पंडित पाटील इत्यादी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते।


गुप्त पध्दतीने घेण्यात आलेल्या या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ठाणे सहाय्यक निबंधक शामकांत साळुंखे यांनी काम पाहिले.तर
कृषी बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे हेही उपस्थित होते।

Related posts

पुणे मनपा ने ब्रेक द चेन के तहत मनपा सीमा के लिए संशोधित आदेश जारी

Bundeli Khabar

चोरी व छिनैती की घटनाओं में बेतहाशा वृद्धि

Bundeli Khabar

अटाळी आंबिवली व्यापारी संघटनेतर्फे कोकण पूरग्रस्तांना मदत

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!