25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » कल्याण आर एस पी युनिट च्या माध्यमातून झकारिया एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौजन्याने सांगली जिल्ह्यातील 200 पूरग्रस्तांना कपडे,रेशन आणि भांडी वाटप
महाराष्ट्र

कल्याण आर एस पी युनिट च्या माध्यमातून झकारिया एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौजन्याने सांगली जिल्ह्यातील 200 पूरग्रस्तांना कपडे,रेशन आणि भांडी वाटप

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : सांगली जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असताना कोयना नदीच्या पात्राणे अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा संसार उध्वस्त झाला असताना कल्याण डोंबिवली ठाणे विभागाचे आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाचे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झकरिया एज्युकेशन फौंडेशन यांच्या सौजन्याने सांगली जिल्ह्यातील तासगाव, नागठाणे, सांगली धामणी रोड येथील पुरग्रस्त २०० लोकांना, नागठाणे येथील उद्योजक व सरपंच प्रशांत पाटील ,ग्रामपंचायत सदस्य रूशाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महिन्याचे किराणा किट, भांडी, आणि कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आर एस पी महासमादेशक अरविंद देशमुख यांनी सांगितले की, कल्याण ठाणे युनिट चे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. कमांडर मनिलाल शिंपी आणि त्यांची टीम पहिल्या लॉकडाऊनपासून गोरगरिबांची आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करीत आहे।

विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शक्य असेल ती मदत पोचवण्याचे कार्य स्वामीनारायण ट्रस्ट युवक संघ, जेजस लाइफ ट्रस्ट, समाजसेवक सोन्या पाटील, समाज सेवक रामचंद्र देसले साहेब, सी एन पाटील फाउंडेशन, झकारिया एज्युकेशन ट्रस्ट यासारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून 40 ते 50 हजार कुटुंबांना रेशन वाटप ,चादर वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबवित आहेत. नागठाणे येथील सरपंच यांनीही आमच्या गावाला मिळालेली मदत ही खूप महत्त्वाची आणि मोलाची आहेत व योग्य वेळी प्राप्त झाले त्याबद्दल आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे सांगली धामणी रोड येथील स्थलांतरित कामगारांची संपूर्ण जीवन उध्वस्त झाले होते अशा ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कांबळे आणि हेड कॉन्स्टेबल अशोक कोळी, मनोज टोणे, मुख्याध्यापक वाघमारे यांच्या उपस्थितीत तेथील मजुरांना देखील भांडी,रेशन किट आणि कपडे वाटप करण्यात आले।

या संदर्भात बोलताना झकारिया एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन झकारिया लकडावाला, यांनी सांगितले की मनीलाल शिंपी यांच्यामुळेच आम्हाला खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचविणे शक्य होत आहे आणि यापुढे आम्ही शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानेच सेवा करत राहणार असे सांगितले. या उपक्रमासाठी आर एस पी अधिकारी कल्याण घनश्याम सोनवणे, छोटू अहिरे, झकारिया एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्त मलाड मुंबईचे श्रीराज शेख ,फिरोज हाजमी, सनी चौघ, यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच तासगाव तालुका समादेशक शहाजी खरमाटे, आर एस पी अधिकारी अभिजित तासगावकर, सी.वाय होरे, साजिद मुजावर, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी नियोजनासाठी मोलाचे परिश्रम घेतले. वाळवा नागठाणे, नांदगाव परिसरातील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत पाटील यांनी दात्यांचे विशेष आभार मानले।

Related posts

सोनाळे ग्रामपंचायत कडून कोरोना रुग्णांसाठी आर्थिक मदत

Bundeli Khabar

ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी

Bundeli Khabar

हा फोटो बघितला आणि क्षणभर थबकलो.

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!