किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : ईश्वर सेवा हीच मानव सेवा ! जनसेवाहितार्थ निस्वार्थ परोपकारीवृतीचे शिवसेनेचे कार्यरत सेवाभावी नगरसेवक श्री बाळकृष्ण ब्रीद यांचा आज मंगळवार दिनांक ३१\०८\२०२१ जन्मदिवस आहे. विशेषतः गोकुळाष्टमी दहिकाला आणि बाळकृष्ण ब्रीद यांचा जन्मदिवस एकाच दिवशी हा दुग्धशर्करा योगायोग आहे.तसेच शिवसेना शाखाप्रमुख, विभागसंघटक ते बृहन्मुंबई महानगर पालिकेतील धडाडीचे कार्यसम्राट नगरसेवक असा त्यांचा नेत्रदीपक उल्लेखनीय प्रवास प्रत्येक शिवसैनिकांना, तमाम नागरिकांना अभिमानास्पद आहे. त्यामागे हिन्दुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा शुभाशीर्वाद !
शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन, बृहन्मुंबई महानगर उपनगर पालकमंत्री महोदय युवासेना अध्यक्ष माननीय श्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून दहिसरचे शिवसेनेचे नगरसेवक श्री बाळकृष्ण ब्रीद आपल्या कुटुंबासह जिवावर उदार राहून कोरोना काळात दीडदोन वर्ष जनसेवाहितार्थ दिवस रात्र राबत आहेत.त्यांचा नगरसेवक मतदारसंघ दहिसर विधान सभा आणि मागाठाणे विधान सभा क्षेत्रात समाविष्ट आहे.दहिसर चेकनाकापासून ते केतकीपाडा,कानडे मैदान,वैशाली नगर ओवरीपाड्यातील शांतीनगर टेकडी टपाल कार्यालय , आणि शिधावाटप कार्यालयाच्या शैलेंद्र नगर जवळून गोलाकार एक्स्प्रेस हायवे,ते स्वामी विवेकानंद मार्ग असा मोठा संमिश्र भाषिक मतदारसंघाचे नेतृत्व करीत असतानाच बाळकृष्ण ब्रीद यांच्या नगरसेवक या नात्याने प्रत्यक्ष सामाजिक, विधायक कार्याचे डौलदार डोंगर दिसून येतात. त्यांनी स्वतःचे घरदार विसरून कोरोना काळात प्रथम कोराना महामारीच्या संकटाला महत्त्व दिले.जगापुढे, देश-राज्य- बृहन्मुंबई महानगरात बाळकृष्ण ब्रीद यांची मानवता आणि माणूसकी दिसून आली.अगदी सुरूवातीला सन २०१९-२०२० गत वर्ष संपत असताना त्या काळात याविषयीची साधन सामुग्री फारशी उपलब्ध नसताना देखील दहिसर पोलीस ठाणे, दहिसर अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर आरोग्य सेवेला सुरुवातीलाच चेहर्यावरील कपड्याची मुखपट्टी (मास्क), सॅनिटायझर, हातमौजे उपलब्ध करून दिले. तसेच तातडीने संपूर्ण मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य डिपार्टमेंटच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृतीपर समाजप्रबोधन स्तुत्य उपक्रम, स्वच्छता अभियान खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सतत कार्यरत राहिल्यामुळे विभागातील अनेकांना जीवदान मिळाले.तसेच संसर्गजन्य महारोगराई महामारीत त्यांचे सर्वत्र रोगनिदान चाचणी आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन ठिकठिकाणाहून मोठ्याप्रमाणात रूग्णांना तातडीने बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य रूग्णालयात अलगीकरण दाखल करण्यात आले.तसेच त्यांच्या रूग्णाच्या कुटुंबासह विलगीकरण करून त्यांचीही आपुलकीने काळजीपूर्वक चांगली रहाणे,जेवणखाण, अशी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली. तसेच घरासारखी आपुलीकीच्या मायेने सेवा केल्याने प्रत्येकाला बाळकृष्ण ब्रीद हे जणु देवच वाटत आहे.जनतेच्या मदतीला धावणारा असा हा देवमाणूस आहे. विशेषत: त्यांनी या कामाचे सर्व श्रेय आपल्या शिवसेना पक्षाला,नेतृत्वाला,तर विद्यमान आमदार महोदयाकडून आदरणीय शिवसेना विभागप्रमुख श्री विलासभाई पोतनीस, तसेच कार्यसम्राट आमदार महोदय आदरणीय श्री प्रकाशदादा सुर्वे, विभागसंघटक, उपविभागप्रमुख, महिला विभाग संघटक,उपविभाग संघटक, युवाविभाग अधिकारी, भारतीय विद्यार्थी सेना पदाधिकारी, कामगार सेना, तर खांद्याला खांद्या लावून काम करीत आहेत, असे आमचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सर्वच महिला पुरूष शिवसैनिक आजही कार्यरत आहे.याचा मला अभिमान नक्कीच वाटतो।
तसेच कोरोना काळात अनेक श्रमिकांनी आपल्या गावांकडे जाताना दहिसर चेकनाकावर असंख्य लोकांपर्यंत पिण्यास शुध्द मुबलक पाणी,प्रथमोपचार वैद्यकीय उपचार, खानपान सेवा आणि आपले कोरोना यौध्दा पोलीस, अग्निशमन दल, आणि वैद्यकीय सार्वजनिक आरोग्यसेवक, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे सफाई कामगार, बेस्ट, एसटी वहातूक कर्मचारी या सर्वांसाठी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी आपले जनसंपर्क कार्यालय रात्र दिवस कार्यरत ठेवले आहे.तसेच आपल्या मतदारसंघातील विभागातील प्रत्येक कुटुंबियांना लाॅकडाऊन टाळेबंदी आणि संचारबंदीच्या कोरोना काळात वेळेवर दूध, किराणा माल, भाजीपाला, सर्व अत्यावश्यक सेवेपासून व्यवस्था शिवसैनिकां मार्फत स्वतःच जातीने रस्त्यावर उतरून काम करीत असलेला सच्चा शिवसैनिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद हे आपल्या मतदारसंघात डोंगराळ भागात, झोपडपट्टीतून,चाळी , इमारतीत गृहनिर्माण सहकारी सोसायटीत अत्यावश्यक वस्तू पुरवठा सेवाकेंद्र उभारून सुसज्ज पध्दतशीर मानव सेवेत बाळकृष्ण ब्रीद आजही रमलेले आहेत. शासकीय आदेशानुसार ते आजही सामाजिक सुरक्षिततेचा विचार व्यक्त करताना तोंडावर मास्क आवश्यक, तर सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ धुवून दोन व्यक्तीमधील अतंर ठेवून विद्यमान जागृत नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी आपल्या मतदारसंघात प्रत्येक नागरिकांची काळजीपूर्वक विचारपूस करतात।
आदरपूर्वक उपयुक्त वस्तुचे वितरण विनामूल्य वेळोवेळी केलेले आहे. त्यांनी वैशाली नगर नरेंद्र पार्क संजिवनी हायस्कूलच्या शानदार सभागृहात दहिसर विधान सभा,मागाठाणे विधान सभा क्षेत्रातील गृहनिर्माण, गृहसहकारी सोसायटीतील जमिन मालकी हक्क हस्तांतरित कनवेस्ट शासकीय महसूल विभागांतर्गत कामकाज शिबीर जेष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड अजित मांजरेकर यांच्या मार्गदर्शनपर यशस्वी केले होते.जनतेचा खूप छान प्रतिसाद या स्तुत्य उपक्रमाला लाभला होता. व्यक्तीमत्व व्यक्तीविशेष शिबीर, व्यवसाय, स्वयंरोजगारासाठी शिबीर, आरोग्य चिकित्सक शिबीर आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या पाठीशी कायम निष्ठापूर्वक प्रत्येक कामात पाठींबा आहे.विभागातील त्यांच्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विकास कामांचा धडाका आजही सर्वांनाच पहायला मिळतोय. सार्वजनिक सुसज्ज आधुनिक शौचालयापासून अनेक वास्तूचीं उभारणी केली आहे.आज त्यांच्याबरोबर त्यांचे दोन्ही सुपुत्र समाजसेवत कार्यरत आहेत. युवासेना विभाग संघटक अधिकारी श्री ऋषी बाळकृष्ण ब्रीद कल्पकतेतून उत्कृष्ट जनसंपर्क, जनसेवाहितार्थ सामाजिक अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्याचे काम करीत आहे.आज मंगळवार दिनांक ३१ऑगस्ट २०२१ सकाळी दहापासून दुपारी एक वाजेपर्यंत जीवन सुकन्या प्रत्येक महिलांची हितकारक शासकीय योजनेंतर्गत भारतीय टपाल सेवा, जनसेवाहितार्थ पोहचविण्याचे काम आपल्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी शुभ दिवशी दहिसर प्रभाग क्रमांक तीन मतदारसंघात शिवसेना नगरसेवक श्री बाळकृष्ण ब्रीद पोहचविण्याचे काम करीत आहेत .या विभागातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती दत्ताराम घुगे यांनी दिली।

