28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210831 WA00203
महाराष्ट्र

धक्का लागण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांवर प्राणघातक हल्ला,घटना सिसीटीव्हीत कैद

Bundelikhabar

धक्का लागण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांवर प्राणघातक हल्ला,घटना सिसीटीव्हीत कैद,
कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरु,
कल्याणमध्ये गावगुंडाची दहशत सुरूच.

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
कल्याण : किरकोळ वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहेत।
गेल्या काही दिवसापासून कल्याणमध्ये भर रस्त्यात गावगुंडाकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिस यंत्रणा या गावगुंडाना आवरण्यात अपयशी ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे यांना आवर घालण्यासाठी परिसरात गस्त मारण्याची आवश्यता निर्माण झाली आहे चौकाचौकात पोलीस दिसल्यास अपराधीक कृती दहशत कमी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते .
कल्याण पूर्व भागातील काका ढाबा परिसरात काही तरुणानी कापड दुकान चालविणाऱ्या संतोष प्रजापती आणि विजय दुबे या दोघांवर धारदार शस्त्र आणि काठीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
विजय आणि संतोष हे दोघे दुकान बंद करुन पानाच्या टपरीवर पान खाण्यासाठी गेले होते. त्याच ठिकाणी काही तरुणांशी धक्का लागण्यावरुन या दोघांचा वाद झाला.या वादाचे रुपांतर हाणारीत झाले. टोळक्याकडून झालेल्या हल्ल्यात विजय आणि संतोष हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णलायात उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहे।
या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापसून चक्कीनाका, खडे गोलवली, चिकनी पाडा काकाचा ढाबा परिसरात गावगुंडाची दहशत खूपच वाढली आहे.त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करून वाढणाऱ्या घटनांवर आवर घालावे असे व्यापारी विजय दुबे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ।


Bundelikhabar

Related posts

एलआईसी आईपीओ की पॉलिसीधारक श्रेणी क्‍या बदलेगी खुदरा निवेशकों के आईपीओ देखने का तरीका? यहां जानें

Bundeli Khabar

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली शाळा सुरू करण्यास मान्यता

Bundeli Khabar

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १,५०० रुपयांची वाढ, मोबाईलही मिळणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Bundeli Khabar
error: Content is protected !!