27.9 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » अनधिकृत इमारती बांधकामामध्ये नागरिकांनी घर खरेदी करू नये महापालिकेचे आवाहन
महाराष्ट्र

अनधिकृत इमारती बांधकामामध्ये नागरिकांनी घर खरेदी करू नये महापालिकेचे आवाहन

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण डोंबिवली
महानगरपालिका प्रशासकीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपायुक्त श्री. सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील जन गण मन शाळेच्या शेजारी असलेल्या अनधिकृत इमारतीबाबत जमीन मालक यांच्याविरुद्ध एम.आर.टी.पी ऍक्ट-३९७ अ प्रमाणे दि:-०८-जुलै २०२१-रोजी,प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी विष्णुनगर पोलीस स्टेशन,डोंबिवली प.येथे गुन्हा दाखल केला होता, त्या नुसार संबंधित अनधिकृत बांधकामधारकांवर पुढील कारवाई होऊन त्याबाबतची इतंभुत माहिती जो पर्यंत समोर येत नाही व त्या बाबत खुलासा होत नाही तोपर्यंत
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्या, मतदात्या सर्वसामान्य नागरिकांना पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते की,त्यांनी महानगरपालिका क्षेत्रात स्वतःचे घर खरेदी करण्या पुर्वी इमारतीच्या-जागेच्या अधिकृततेबाबत महापालिकेकडील टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४३९२-व १८००-२३३-७२९५-या दूरध्वनीवर खातरजमा करूनच इमारतीत स्वतःचे घर खरेदी करावे जेणे करून आपली फसवणूक व आर्थिक नुकसान होणार नाही.म्हणून आपलं नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत बांधकामात सदनिका घरे खरेदी करू नये असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्थ नागरिकांना करण्यात येत आहे….

Related posts

पासी जनजागृति संस्था के राष्ट्रीय उपाध्यक्ष के रूप में डॉ. सी आर सरोज की नियुक्ति

Bundeli Khabar

डॉ. अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड

Bundeli Khabar

डीपी रस्त्यात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर क.डों.म.पा.ने चढवला बुलडोझर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!