29.7 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20220413 WA0005
महाराष्ट्र

डॉ. अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी विभागातील सुप्रसिद्ध डॉ. अनिल आव्हाड यांची इंडियन मेडिकल असोसिएशन, मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण समारंभ मुंबई हाजीअली येथील “आय एम ए हाऊस” येथे संपन्न झाला. आय एम ए दिल्लीचे सेक्रेटरी जनरल डॉ. जयेश लेले हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आय एम ए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल आव्हाड यांनी त्यांच्या पुढील वर्षातील योजनांबद्दल माहिती दिली. वैद्यकीय व्यावसायिकांची जनमानसातील प्रतिमा उंचावणे, डॉक्टरांचे वैयक्तिक आरोग्य व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य यांचे महत्त्व ओळखून ते उत्तम राखण्यासाठी नवीन योजना आखणे, डॉक्टरांच्या मनावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करणे; ज्यामध्ये वेगवेगळे खेळ, संगीत आणि पर्यटन याचा समावेश असेल असे विविध कार्यक्रम राबविण्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. सदर सोहळ्यास मुंबई शहरातील अनेक नामांकित डॉक्टरांनी आपली उपस्थिती दर्शविली.


Bundelikhabar

Related posts

प्रहार जनशक्ति पक्ष का रिमोट कंट्रोल ठाणे में

Bundeli Khabar

अनुज डान्सिंग सेन्सेशन मिथुन चक्रवर्ती मध्ये बदलला

Bundeli Khabar

नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका, बंगल्यातील बेकायदा बांधकाम दोन आठवड्यात पाडण्याचे निर्दे

Bundeli Khabar
error: Content is protected !!