31.3 C
Madhya Pradesh
May 16, 2024
Bundeli Khabar
Home » कु.प्रसाद शिंपी याचा १५ वा वाढदिवस अनाथाश्रमातील मुलांसोबत साजरा
महाराष्ट्र

कु.प्रसाद शिंपी याचा १५ वा वाढदिवस अनाथाश्रमातील मुलांसोबत साजरा

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण आंबिवली येथे राहणारे आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र कु.प्रसाद मणिलाल शिंपी यांनी आपला वाढदिवस साजरा करण्या साठी चक्क आपल्या वडिलांना सांगून अनाथ आश्रमातील व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून आश्रमातील विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन जीवनावश्यक वस्तू कोणत्या देता येतील याचा विचार करून माझा वाढदिवस हा त्यांच्या सोबत साजरा करायचा आहे असे सांगितल्यानंतर कमांडर मणिलाल शिंपी यांनी पारस बाल भवन निसर्ग गुरुकुल अनाथ आश्रम टिटवाला म्हस्कल यांच्याशी संपर्क साधून वाढदिवसाचे नियोजन केले. मात्र सदर अनाथाश्रम हे वृद्धाश्रम आहे ।

विद्यार्थ्यांसाठी नसले तरी त्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना लागणाऱ्या वस्तू भेट देऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याचा मानस केला.त्यामुळे सदर अनाथाश्रमातील वृद्ध आजी-आजोबांना जेवण ,फरसान,व कपडे वाटप करून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांनी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना समजगृहा मध्ये एकत्र बोलावून त्यांच्यासोबत स्नेहभोजन करून आपला वाढदिवस छोटेखानी पद्धतीने साजरा केला हा वाढदिवस स्वतःसाठी नसून इतरांसाठी साजरा केला असे म्हणायला वावगे ठरू नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आपल्या वडिलांचे ब्रीद वाक्य त्यांनी त्याच्या पंधराव्या वाढदिवसा निमित्ताने सातत्यात उतरविले व आपल्या वडिलांचा वारसा पुढे कसा चालविला जाईल हे त्यांनी सर्वांना प्रेरणादायी आठवण म्हणून कायम स्मरणात राहील हे त्याच्या वाढदिवसा निमित्ताने दाखवून दिले. उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कुमार प्रसाद यांचे वडील कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.विशेष म्हणजे प्रसादने ऑनलाईन शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना जुने मोबाईल फोन घेऊन दुरुस्त करून जवळपास ४२ मोबाईल वाटप केले आहेत.तसेच लॉकडाऊन च्या काळात रोजगार बंद असलेल्या गरजूंना रेशन वाटप करण्याचीही सेवा प्रसाद ने केली आहे.हे हे कार्य कौतुकास्पद आहे त्यामुळे त्याचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस आरोग्यदायी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद …

Related posts

ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग अध्यक्षपदी सुनील जगताप यांची निवड

Bundeli Khabar

आयुष्याचं सार्थक कशात

Bundeli Khabar

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व मिरा भाईंदर चा सुपुत्र करण पवार याची महाराष्ट्र बॉक्सिंग संघात निवड

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!