21.3 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20220928 WA0002
महाराष्ट्र

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व मिरा भाईंदर चा सुपुत्र करण पवार याची महाराष्ट्र बॉक्सिंग संघात निवड

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मिरा भाईंदर मधील रहिवासी असलेला करण तानाजी पवार गेल्या १३ वर्षांपासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. या कालावधीत त्याने कराटे मध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदके जिंकून आपले नाव “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंदवले आहे. फक्त इथेच न थांबता आता त्याने बॉक्सिंगचा प्रवास सुरू केला आहे.
२५ सप्टेंबर रोजी मिरा रोड येथे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या नियमा अंतर्गत जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये १२ बॉक्सिंग क्लबचा सहभाग होता. त्यामधे मिरा भाईंदरचा सुपुत्र करण तानाजी पवार याने -६० किलो या वजनगटात, सलग राऊंड जिंकत सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच त्याची निवड महाराष्ट्र बॉक्सिंग संघात करण्यात आली आहे.
बॉक्सिंग सारख्या खेळात सुवर्ण पदक जिंकून त्याने संपूर्ण शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. या कामगिरीमुळे करणवर मिरा भाईंदरमध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Bundelikhabar

Related posts

६१व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गिरगाव केंद्रातून ‘नात्याची गोष्ट’ प्रथम

Bundeli Khabar

योडा आणि अनिल अग्रवाल फाऊंडेशनतर्फे १०,००० बेघर पशु जनावरां साठी भव्य भोजन योजना

Bundeli Khabar

बातमी लिहिताना माहिती हे तुमचं अन्न आहे व अन्न मिळाले तरच आपलं पोट भरू शकतो – कैलास म्हापदी

Bundeli Khabar
error: Content is protected !!