मास्क, सॅनिटायझर आणि पल्स ऑक्सिमीटरचे केले वाटप
प्रमोद कुमार/महाराष्ट्र
ठाणे : केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाच्या सी.एस.आर फंडातून कोरोना काळात साथरोग रोखण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आशा स्वयंसेविकांना मास्क, सॅनिटायझर आणि पल्स ऑक्सिमीटर आदि वस्तूंचे वाटप करण्यात आले।
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, अतिरिक्त आयुक्त ( केंद्रीय वस्तू व सेवा कर ) विशाल जरंडे, सहआयुक्त धनंजय माळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, सहाय्यक आयुक्त (केंद्रीय वस्तू व सेवा कर ) उमेश चौगुले, अधीक्षक सचिन कुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, मनिष रेंघे, आदी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात आशांना या भेटवस्तू देण्यात आल्या।
कार्यक्रमा दरम्यान सर्व मान्यवरांनी कोरोना काळात आशांनी केलेल्या कामाचे कौतूक करत आगामी काळात संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी या तिन्ही वस्तूं स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही सांगितले. यावेळी आशांनी कोरोना काळात काम करतांना आलेल्या अडचणी कथन करून प्रशासनाने केलेले सहकार्यही विषद केले।

