24.4 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20211024 WA0002
महाराष्ट्र

महापालिकेच्या जे प्रभागातील अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची कारवाई

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार महापालिकेच्या 4/जे प्रभागातील सहा. आयुक्त वसंत भोंगाडे यांनी कल्याण पूर्व, कर्पे वाडी, तिसगाव येथील संतोषी माता इमारत ( G+3) ही अतिधोकादायक इमारत निष्कासनाची धडक कारवाई आज केली. सदर अतिधोकादायक इमारत ही 35 वर्षे जुनी असून या इमारतीस सन 2018 पासून नोटीस बजाविण्यात येत होती, इमारतीचे मालक यांनी सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता सदर इमारत सी-1 कॅटेगरीत अतिधोकादायक असल्याने तिचे तात्काळ निष्कासन करणे आवश्यक होते ,या इमारतीमधील रहिवाशांना यापूर्वीच रहिवास मुक्त करण्यात आले होते. सदर निष्कासनाची कारवाई महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी/कामगार, महापालिकेचे पोलीस कर्मचारी व 1 पोकलेन , 1 जेसीबी, यांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.


Bundelikhabar

Related posts

Salute to Nari Shakti – Dr. Sumaya Reshma

Bundeli Khabar

बेयोंसे और अंश तिवारीने हासिल किया रेनबो प्राइड ऑफ इंडिया का खिताब

Bundeli Khabar

महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

Bundeli Khabar
error: Content is protected !!