25.6 C
Madhya Pradesh
October 3, 2026
Bundeli Khabar
IMG 20210827 WA0040
महाराष्ट्र

पालघर विभागीय एस टी आगरातून, गौरी गणपती साठी कोकणात जाणार्‍याना बसेसची कमतरता पडता कामा नये – श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
पालघर : गौरी गणपतीच्या सणासुदीला पालघर विभागीय आगरातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आदी ठिकाणी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना ( नोकरदार वर्ग ) जास्तीत जास्त बसेस पालघर विभागीय आगरातून सोडण्यात याव्या. व प्रवासी यांना सुविधा मिळाव्यात. या साठी श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांनी श्री राजेश जगताप ( गांधी नगर पालघर पूर्व येथील ) एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक, यांची २६ आॅगस्ट २०२१ रोजी भेट घेऊन श्रीचे आगमन १० सप्टेंबर रोजी जरी होत तरी कोकणात जाणार्‍या साठी त्या अगोदर सोडाव्या व कोकणात जाणार्‍यान साठी बसेसची कमतरता भासू देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे केली आहे. वरील विनंती अनुसार ४ सप्टेंबर शनिवार पासून वसई, अर्नाळा, नालासोपारा येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगरातून साध्या – रातराणी – शिवशाही अशा बसेसची सोय करण्यात आलेली आहे।

कोकणात जाण्यासाठी २४७ बसेस व परतीसाठी ४३ बसेसची सोय करण्यात आल्याची माहिती श्री केदार काळे यांच्या कडून मिळत आहे. तसेच पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू या आगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवासी यांच्या मागणी अनुसार ( बस मधे उपलब्ध असलेल्या जागा – सीट पुर्णपणे भरत असल्यास ) या ठिकाणाहून सुध्दा बसेस सोडण्याची तयारी श्री राजेश जगताप विभागीय नियंत्रक पालघर यांनी केदार काळे यांच्याशी बोलताना सांगितले असल्याचे समजत आहे.तसेच बसेसने प्रवास करणाऱ्यांना आॅफ लाईन म्हणजे प्रत्यक्ष बस सुटणाऱ्या आगरात ( डेपोत ) जाऊन तिकीट आरक्षण ( रिझर्वेशन ) करता येईल. तसेच आँनलाईन आरक्षणासाठी MSRTC ॲप व्दारे ही आरक्षण करता येणार आहे.


Bundelikhabar

Related posts

एन.के.जी.एस.बी. निवडणूकीत आशीर्वाद पॅनलला मराठा समाजाचा पाठिंबा

Bundeli Khabar

सात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 10% आरक्षणामधून नियुक्त्या

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – राजस्थानचा रॉयल विजय

Bundeli Khabar
error: Content is protected !!